आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानालासाेपारा येथील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करुन तिचा मृतदेह बॅगेत भरुन पुणे - मुंबई रेल्वे मार्गावरील तळेगाव दाभाडे रेल्वे स्थानकावर टाकून दिल्या प्रकरणी तीनजणांना विशेष न्यायाधीश जे. जी. डाेलारे यांचे न्यायालयाने शुक्रवारी मरेपर्यंत जन्मठेपची शिक्षा सुनावली.
न्यायालयाने दिलेल्या शिक्षेत आराेपींना सामूहिक बलात्कार प्रकरणात मरेपर्यंत जन्मठेप, अपहरण प्रकरणी पाच वर्ष कैद, पुरावे नष्ट केल्याप्रकरणी तीन वर्ष कैद व प्रत्येकी २५ हजार रुपयांचा दंड सुनावला आहे.
राहुल रविंद्र बरई (वय- २९), ईशान हमजान अली कुरेशी (२९) व संताेष विष्णु जुगदर (२९, तिघे रा.वडाळा, मुंबई) अशी शिक्षा झालेल्या आराेपींची नावे आहे. तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशनवर मे 2014 मध्ये एका लाल रंगाच्या बॅगेत पाेलीसांना मुलीचा मृतदेह मिळून आला हाेता. त्यानंतर पाेलीसांनी तपास केला असता, सदर आराेपींपैकी संताेष जुगदर मुलासाेबत तिचे प्रेमसंबंध हाेते. संताेष हा गुन्हेगार हाेता व त्याच्यावर खून, चाेरीचे गुन्हे दाखल आहे.
तो या मुलीस त्याचा मित्र राहूल याच्या घरी नेले हाेते. त्याठिकाणी आराेपींनी मुलीस आर्थिक व्यवहाराच्या गुन्ह्यात मदत करण्यास सांगितले. परंतु त्यास मुलीने नकार दिला. त्यामुळे तीन आराेपींनी संगनमताने तिचा ओढणीने गळा आवळून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह नष्ट करण्यासाठी ताे एका बॅगेत भरला.
कॅबने तो मृतदेह मुंबईतील सायन रेल्वे स्थानकावर आराेपींनी आणला. तेथून आराेपी तळेगाव दाभाडे रेल्वे स्थानकावर येवून त्यांनी मृतदेह असलेली बॅग त्याठिकाणी आडबाजूला साेडून पळ काढला हाेता. विशेष सरकारी वकील लीना पाठक यांनी याप्रकरणात आराेपींना फाशीच्या शिक्षेची मागणी केली हाेती. तर या खटल्यात विशेष सरकारी वकील वामन काेळी यांनी देखील कामकाज पाहिले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.