आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:अल्पवयीन मुलीवर लोणावळा येथे अतिप्रसंग करणारा अटकेत; पुण्यातील घटनेप्रकरणी गुन्हा दाखल

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
परतावा देण्याच्या आमिषाने 88 लाखांची फसवणूक - Divya Marathi
परतावा देण्याच्या आमिषाने 88 लाखांची फसवणूक

लोणावळा येथे अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून तिच्यावर अतिप्रसंग करणाऱ्या एकास लोणावळा पोलिसांनी अटक केली.

याबाबत पीडीत मुलीच्या आईने लोणावळा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी दीपक संजय सोनवणे (वय 28, रा. तुंगार्ली, लोणावळा) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरुद्ध बलात्कार तसेच बाललैगिंक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सोनवणे याने अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून लोणावळ्यातील रेल्वेच्या मोकळ्या जागेत नेले.

तेथे त्याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीला सोडून सोनवणे पसार झाला. घाबरलेल्या मुलीने या घटनेची माहिती आईला दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास करून सोनवणेला अटक केली. पोलिस निरीक्षक सीताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदेश बावकर तपास करत आहेत.

गुंतवणुकीवर परतावा देण्याच्या आमिषाने 88 लाखांची फसवणूक

दाम्पत्याच्या विरुद्ध गुन्हा

गुंतवणुकीवर परतावा देण्याच्या आमिषाने ८८ लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी एका दाम्पत्याच्या विरुद्ध वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

संतोष लक्ष्मण लिमण (वय 37) आणि त्याची पत्नी अक्षता (वय 35, रा. समर्थ निवास, गुरुदत्त काॅलनी, आंबेगाव पठार, धनकवडी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत संतोष तुकाराम कोंढाळकर (वय 40, रा. कर्वेनगर) यांनी वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी लिमण यांनी टीएसपीएएन प्रा. लि. कंपनीत गुंतवणूक केल्यास दीडपट परतावा देण्यात येईल, असे आमिष दाखविले होते. कोंढाळकर आणि त्यांच्या मित्रांनी लिमण यांच्या कंपनीत 88 लाख 14 हजार रुपये गुंतवले होते.

लिमण दाम्पत्याने त्यांना परतावा दिला नाही. याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी कोंढाळकर यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कोंढाळकर यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.