आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात शिक्षकांकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग:पाषाण परिसरातील शिक्षकाने 16 वर्षाच्या मुलीला दाखविले अश्लील फोटो

पुणे4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील एका पेटिंग शिकवणाऱ्या शिक्षकाने त्याच्या स्टुडिओत पेटिंग शिकण्यासाठी आलेल्या 16 वर्षीय मुलगी एकटी असल्याचा फायदा घेत तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पिडित मुलीने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आराेपी चित्रशिक्षकास अटक केली आहे.

निलेश नानासाहेब पवार (वय-49,रा.पाषाण,पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. चतृश्रृंगी पोलिस ठाण्यात याबाबत दाखल करण्यात आलेला आहे. सदरचा प्रकार 16 नाेव्हेंबर राेजी घडलेला आहे. आराेपी निलेश पवार यांचे पाषाण परिसरात शिवशक्ती चाैक येथे आर्ट स्टुडिओ आहे. तक्रारदार या सदर ठिकाणी पेटिंग शिकण्यासाठी गेल्या असताना, पेटिंग टिचर असलेले निलेश पवार यांनी स्टुडिओत विद्यार्थीनी एकटीच असल्याचे पाहूून तिच्या पायाला स्पर्श करुन तुझे पाय किती मऊ व सुंदर आहेत असे म्हणून नंतर हाताला स्पर्श करुन तुझे हात किती सुंदर आहे असे म्हणाले. अल्पवयीन मुलगी ही राधाकृष्णच्या पेटिंग मद्ये रंग भरत असताना, आराेपीने त्याच्या स्टुडिओच्या दरवाज्याची कडी आतमधून लावून पिडितेस अश्लील फोटो त्याच्या माेबाईलमध्ये दाखवले.

त्यानंतर तिला मिठीत घेऊन ‘तु मला खूप आवडते, तु केस माेकळे साेडत जा, तु माेकळे केस असताना खुप सुंदर दिसतेस. असे म्हणत अश्लील वक्तव्ये सुरू केले. तर आय लव यु म्हणून तिच्या पायाला व गालाला चिमटा काढून तिचा विनयभंग केला आहे. याप्रकरणी पुढील तपास चतुश्रृंगी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एस भालेराव करत आहे. ​​​​​

पित्याकडून चिमुरडीचा विनयभंग

एका 43 वर्षीय पित्याने स्वत:च्या दहा वर्षाच्या मुलीस राहते घरी जवळ बाेलवुन तिचा विनयभंग केला. तसेच दाेन ते तीन वेळा रात्रीची ती झाेपलेली असताना तिच्या पायावरुन पाय फिरवून मुलीचा विनयभंग केला.

याबाबतची तक्रार मुलीने आईकडे केल्यानंतर, आईने पतीकडे विचारणा केली असता तिला पतीने शिवीगाळ करत मारहाण केल्याने मुलीच्या आईने याबाबत विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी दाेषी पित्यास अटक केली आहे

बातम्या आणखी आहेत...