आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुण्यातील शिवाजीराव भोसले बँक प्रकरणातील मुख्य आरोपी आमदार अनिल भोसले यांनी किडनीच्या आजारामुळे वैद्यकीय कारणास्तव केलेली तात्पुरत्या जामिनाची मागणी आर. एन हिवसे न्यायालयाने सोमवारी फेटाळली आहे अशी माहिती देण्यात आली आहे.
आमदार भोसले यांनी किडनीच्या आजारांचे उपचार ससून रुग्णालयात उपलब्ध नाहीत. ते केवळ रुबी, पूना हॉस्पीटल येथेच होत असल्याने तसेच प्रकृती गंभीर झाल्याने जामीनावर सोडण्यात यावे असा जामीन अर्ज न्यायालयात केला होता. मात्र, त्याला फिर्यादी व गुंतवणूकदारांचे वकील सागर कोठारी आणि सरकारी वकील विलास पठारे यांनी विरोध केला.
कोठारी यांनी भोसले एकाच वेळी उच्च न्यायालय मुंबई आणि विशेष न्यायालय पुणे येथे जामिनाचा अर्ज करून दोन्ही न्यायालयांपुढे माहिती लपवून न्यायालयाची फसवणूक करीत असल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच ससून रूग्णालयाने दिलेल्या वैद्यकीय अहवालांबाबत आक्षेप घेतल्याने न्यायालयाने ही बाब ग्राह्य धरीत ससूनने दिलेल्या अहवालाबाबत देखील प्रश्नार्थक मत नोंदविले तसेच या प्रकरणात भोसले यांची पत्नी रेश्मा भोसले अजून फरार आहे आणि इतर १२ आरोपींना अद्याप अटक नाही या बाबी न्यायालयाने त्यांच्या निरीक्षणात नमूद केल्या आहेत.
दरम्यान, सरकारी वकील विलास पठारे यांनी अनिल भोसले यांना उपचाराकरिता जामिनावर सोडण्याची गरज नसून, नियमानुसार सरकारी किंवा खाजगी रूग्णालयात उपचार घेऊ शकतात असा युक्तिवाद केला. न्यायालयाने सरकारी वकील यांचा युक्तिवाद मान्य करीत अनिल भोसले यांच्या तात्पुरत्या जामिनाची मागणी फेटाळली असल्याने भोसले यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
येरवडा कारागृहात कैद्याचा संशयास्पद मृत्यू
पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात खुनाच्या गुन्हयात बंदी असलेल्या एका कैद्याचा संशयास्पद मृत्यु झाला आहे. संदेश अनिल गाेंडेकर (वय-२६,रा.काेल्हेवाडी,खडकवासला, पुणे) असे मयत झालेल्या कैद्याचे नाव आहे.
संदेश गाेंडेकर याला हवेली पाेलिसांनी सन २०१८ मध्ये एका खुनाच्या घटनेत अटक केली हाेती. त्यानंतर तेव्हापासून ताे येरवडा कारागृहात बंदी आहे. त्याचे वडील माेलमजुरी करतात तर आई धुणीभांडटाचे काम करते. ३१ डिसेंबर राेजी त्याचे आईवडील नेहमी प्रमाणे त्यास भेटण्यासाठी कारागृहात गेले हाेते. परंतु सकाळपासून दुपार पर्यंत ते भेटीसाठी थांबूनही त्यांचा क्रमांक आला नाही. मात्र, दुपारी साडेबारा वाजता त्यांना हवेली पाेलीसांचा फाेन आला व त्यांनी सांगितले की, संदेशचा ससून रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे.
त्यामुळे त्याच्या आईवडीलांनी कारागृह प्रशासनावर संशय व्यक्त केला आहे. मुलगा वारंवार त्याची तब्येत खालवल्याने रुग्णालयात घेऊन जावा असे सांगत हाेता, परंतु त्यास वेळेत रुग्णालयात नेण्यात आले नसल्याचा आराेप त्यांनी केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.