आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार गोळीबार प्रकरण:आमदारपुत्रासह चार जणांना रत्नागिरीतून अटक; गोळीबार प्रकरणात आतापर्यंत 9 जणांना अटक

पुणे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सिद्धार्थ अण्णा बनसोडे याला रत्नागिरीतील पावसमधून अटक केली आहे.

पिंपरी चिंचवड शहरात काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या आमदारावर कथित गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी एकाला अटक देखील करण्यात आली आहे. परंतु, हे प्रकरण आता वेगळेच वळण घेताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर काही दिवसांपूर्वी गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, या प्रकरणातील आरोपी तानाजी पवारने उलट आमदार पुत्र सिद्धार्थ बनसोडे आणि त्याच्या साथीदारांवरच अपहरण आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता.

त्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये सिद्धार्थ बनसोडेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तेंव्हापासून फरार होता. परंतु, आज अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांनी सिद्धार्थ अण्णा बनसोडे याला रत्नागिरीतील पावसमधून अटक केली आहे. तानाजी पवार यांच्या कंपनीतील कर्मचाऱ्याला मारहाण आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी सिद्धार्थ बनसोडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कंत्राटदार सिजू अँथनी यांच्या कार्यालयात सिद्धार्थ बनसोडे 11 मे रोजी दुपारी घुसले होते. त्यानंतर दोघा कर्मचाऱ्यांवर लोखंडी टॉमीसारख्या शस्त्राने हल्ला असून सदरील घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दरम्यान, सिद्धार्थ बनसोडेने कंपनीत जाऊन तेथील कर्मचाऱ्यांना मॅनेजर तानाजी पवार कुठे आहेत अशी विचारणा केली होती. त्यानंतर सिद्धार्थ आणि आमदाराच्या पीएसह दहा जणांनी कंपनीतील कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला असल्याचे तक्रारीत नमूद आहे. सदर घटनेत आतापर्यंत आमदार बनसोडे यांच्या पीएला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. तर पुढील तपास पिपंरी चिंचवड पोलिस करत आहे.

बातम्या आणखी आहेत...