आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीकास्त्र:शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना, पंढरपुरात गोपीचंद पडळकरांची जहरी टीका  

पंढरपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शरद पवार यांनी बहुजन समाजातील लोकांवर अन्याय केला असल्याचा आरोपही त्यांनी केला
  • मुख्यमंत्र्यांनी आषाढीची पूजा करु नये - गोपीचंद पडळकर

शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, अशी टीका भाजपचे विधापरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. यासोबतच शरद पवार यांनी बहुजन समाजातील लोकांवर अन्याय केला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस सरकारने धनगर समाजाला तरतूद केलेले एक हजार कोटी या महाविकास आघाडी सरकारने अद्याप दिलेले नाहीत. शरद पवार हे नाशिकला अवकाळी झाल्यानंतर गेले, कोकणात वादळानंतर गेले, मात्र अजुनही त्यांना मदत मिळालेली नाही. हा सगळा फार्स सुरु सुरू असल्याचे म्हणत त्यांनी टीकास्त्र साधले.

पुढे पडळकर म्हणाले की, 'शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे असं माझं मत आहे. कारण अनेक वर्षांपासून ते महाराष्ट्राचं नेतृत्त्व करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची कायमची भूमिका आहे. ते पुढेही अशीच भूमिका चालू ठेवतील. त्यांच्याकडे कुठली विचारधाराही नाही आणि कुठला अजेंडाी नाही, ना व्हिजन आहे. केवळ छोट्या छोट्या समूह गटांना भडकावून आपल्या बाजूला करणं, त्यांच्यावरच अन्याय करण्याची शरद पवारांची भूमिका असल्याचा घणाघात त्यांनी केला. 

पुढे बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, धनगर आरक्षणाबाबत शरद पवार हे पॉझिटिव्ह नाहीत. त्यांना केवळ धनगर समजाच्या विषयावरुन आरक्षणाचं राजकारण करायचं आहे. गेल्या बजेटमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी एक हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं. या सरकारने एक रुपया सुद्धा धनगर आरक्षणासाठी दिला नाही. त्यामुळे विधानसभेच्या अधिवेशनात यावर बोलावं लागणार असल्याचंही ते म्हणाले. 

मुख्यमंत्र्यांनी आषाढीची पूजा करु नये - गोपीचंद पडळकर
पडळकर म्हणाले की, सध्या कोरोना संसर्ग वाढत आहे. यामुळे अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. जर पंढरपुरात बाहेरील लोक, महाराज मंडळीना प्रवेश नसेल तर आषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना करु देऊ नये. त्यांच्या ऐवजी सामान्य शेतकरी कुटुंबातील वारकरी कुटुंबास महापूजेचा मान देण्यात यावा असंही ते म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...