आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य:रोहित पवारांचा इशारा- भाजपचा जंतू दिल्लीत वळवळला, महाराष्ट्राचे पाणी पाजण्याची वेळ आलीये

पुणे15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराजांवर आता सुधांशू त्रिवेदी हा भाजपचा जंतू दिल्लीत वळवळला, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची माफी मागितली, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी केले आहे. त्यावर राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे.

'पाणी पाजण्याची' वेळ आलीय

आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून सुधांशू त्रिवेदींच्या वक्तव्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. आपल्या दैवतांवर एकेकाने चिखलफेक करून दुसऱ्या कुणाचं प्रतिमासंवर्धन करण्याचा तर हा डाव नाही ना? पण आता डोक्यावरून पाणी चाललंय. त्यामुळं डोक्यात पाणी भरलेल्यांना महाराष्ट्राचं 'पाणी पाजण्याची' वेळ आलीय, असा इशारा रोहित पवारांनी दिला आहे.

मनसेची राज्यपालांवर टीका

दरम्यान, शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही राज्यपालांचा निषेध केला आहे. राज्यपालांवर टीका करताना मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले की, 'साठी बुद्धी नाठी' ही म्हण अशा लोकांमुळेच पडली असेल. जिभेला जरी हाड नसेल तरी डोक्यात मेंदू असतो. एवढ्या मोठ्या राज्यपाल पदावर असलेल्यानी बोलताना तारतम्य बाळगणे गरजेचे आहे. या आधीही यांनी वारंवार भावना दुखविण्याचे काम केले आहे. यांच्या वरिष्ठांनी यांना आता दुसरीकडे पाठवायला हवे.

काय म्हणाले सुधांशू त्रिवेदी

सावरकरांच्या माफीनाम्यावरून राहुल गांधींवर टीका करताना राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, सावरकरांच्या काळात अशी निवेदने देऊन माफी मागणे सामान्य होते. सावरकरच नव्हे तर, छत्रपती शिवाजी महाराजांनीही औरंगजेबास असे पाच पत्र लिहिले होते.

जितेंद्र आव्हाडांची टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही सुधांशू त्रिवेदी यांच्यावर टीका करताना ठार वेडाच असे वक्तव्य करू शकतो, असे म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...