आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • MLA Uday Samant Attack Case Pune Sessions Court Remands The Accused To Three day Police Custody, Thorat's Allegation Of Hate Action

आमदार उदय सामंत हल्ला प्रकरण:आरोपींना 3 दिवसांची पोलिस कोठडी, ​​​​​​​सुडबुध्दीच्या कारवाईचा थोरातांचा आरोप

पुणे12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे येथे आमदार उदय सामंत यांच्या वाहनावर झालेल्या हल्ला प्रकरणात शिवसेनेचे हिंगोली जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांना पुणे पोलिसांनी बुधवारी पहाटे साडेपाच वाजता मुंबईतील काळाचौकी पोलिस ठाण्यातून ताब्यात घेतले आहे. यासह सामंतांच्या वाहनावरील हल्ला प्रकरणी 6 जणांना पुणे पोलिसांनी अटक केली. त्यांना बुधवारी पुणे न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

याप्रकरणी आरोपीवर पोलिसांनी भादवी 353, 120, 307, 332 या कलमान्वे गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आज पोलिसांनी सहा जणांना अटक करून त्यांना पुणे सत्र न्यायालयात हजर केले होते. यामध्ये पुणे शिवसेना शहर अध्यक्ष संजय मोरे, राजेश पळसकर, सुरज लोखंडे, चंदन साळुंके, बबन थोरात या आरोपींचा समावेश आहे.

आमदार उदय सामंत आणि त्यांचे पीए पायगुडे कुझर कारने एम.एच./07/ए.जी. 1999 या गाडीमधुन जात असताना त्यांच्यावर बेकायदेशीर जमावाने हॉकी, स्टीकसारख्या हत्याराने हल्ला केला. गाडीची काच फोडुन अंदाजे 1 लाख रुपयांचे नुकसान केले. तसेच सुरक्षिततेकरीता असलेल्या पोलिसांना धक्काबुक्की करून त्यांना देखील मारहाण करण्याचा प्रयत्न केला.

चिथावणीनंतर हिंगोलीत गुन्हा

हिंगोली येथे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात 1 ऑगस्ट रोजी हिंगोली जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी गद्दारांची वाहने फोडल्यास त्यांचा पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सन्मान केला जाईल असे चिथावणीखोर वक्तव्य केले होते. या प्रकरणात शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांची सुडबुध्दीची कारवाई

पुणे येथे आमदार उदय सामंत यांच्या वाहनावर हल्ला झाला त्यावेळी आपण मुंबईत होतो. या प्रकरणात आपला कुठल्याही प्रकारचा संबंध नसतांना पोलिसांनी आपल्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहेत. आता पोलिस काय चौकशी करणार हे पहावे लागणार आहे. तर पोलिसांची हि कारवाई सुडबुध्दीची आहे. अशी प्रतिक्रिया आमदार बबन थोरात यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...