आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात ठिकठिकाणी हनुमान चालिसाचे पठण:मनसे कार्यकर्त्यांची खालकर मारूती मंदिरात महाआरती; आरती झाल्यावर मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पुणे15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज ठाकरेंनी दिलेल्या आदेशानुसार आज पुण्यात ठिकठिकाणी मनसैनिकांकडून महाआरती व हनुमान चालिसाचे पठण केले जात आहे. पुण्यातील मारुती खालकर मंदिरात 11 वाजता मनसे कार्यकर्त्यांनी महाआरती केली. या मंदिराच्या बाजुलाच मशिद आहे. त्यामुळे आज तणाव निर्माण होण्याची शक्यता पाहता पोलिसांनी नोटीस दिली होती. तरीदेखील मनसे कार्यकर्त्यांनी या मंदिरात महाआरती व हनुमान चालिसाचे पठण केले.

त्यामुळे महाआरती संपताच पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, राज ठाकरेंच्या आदेशानुसार पुण्यात ठिकठिकाणी महाआरती करणार आहोत, असे मनसे पदाधिकारी अजय शिंदे यांनी सांगितले आहे. यापुढे पुणेश्वर मंदिरात आरती करण्यासाठी जाणार असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान, राज ठाकरेंनी दिलेला इशारा आणि आंदोलनामुळे पुणे शहरात रात्रीपासून पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. तरीदेखील आज खालकर मंदिरात मनसैनिकांकडून महाआरती करण्यात आली. याच मंदिरात यापुर्वी राज ठाकरे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...