आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्यात मनसेचे खळखट्याक:नातेवाईकाचे पार्थिव नेण्यासाठी रुग्णवाहिका न मिळाल्याने मनसे नगरसेवकाचा संताप, पालिका अधिकाऱ्याची गाडी फोडली

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुण्यात वेळेवर रुग्णालय न मिळाल्यामुळे पत्रकार आणि माजी महापौराचा मृत्यू झाला आहे

कोरोनामुळे निधन झालेल्या नातेवाईकाचे पार्थिव नेण्यासाठी वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने पुण्यातील मनसे नगरसेवकाचा संताप पाहायला मिळाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी पुण्यातील कात्रज भागात कोविडच्या कार्यालयात घुसून एका पालिका अधिकाऱ्याची गाडी फोडली. याप्रकरणी मनसेच्या 6 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या या सर्वांना पुण्याच्या कात्रज पोलिस ठाण्यात नेण्यात आले.

मनसेचे नगरसेवक वसंत मोरे म्हणाले की, "गेल्या चार महिन्यांपासून कोविड रुग्णांना ना रुग्णवाहिका आणि ना रुग्णालयात बेड मिळत आहेत. अधिकारी उपचाराच्या नावाखाली सरकारकडून पैसे तर घेत आहेत मात्र रुग्णांना सुविधा देत नाहीत." यावेळी शहरातील एक पत्रकार आणि माजी नगराध्यक्षांच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित करीत मोरे म्हणाले की, "विचार करा जेव्हा अशा नामांकित लोकांची अशी परिस्थिती असेल तर मग सर्वसामान्यांचे काय हाल होतील." तसेच रुग्णांच्या मृत्यूनंतर त्यांना वेळेवर स्मशानभूमीत जागा मिळत नसल्याचे मोरे यांनी सांगितले.

नांदेडमध्ये वीज विभाग कार्यालयाची केली तोडफोड

मनसेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी नांदेडमध्ये वीज विभागाच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली. स्थानिक मनसे नेते माधव पावडे म्हणाले की, "कोरोनाच्या नावावर जनतेला लुटण्याचे काम सुरू आहे. महावितरण विभागाचे लोक मीटरची रीडिंग न घेताच हजारो आणि लाखो रुपयांचे बिल पाठवत आहेत. वीज बील न भरल्यास वीज पुरवठा खंडीत करण्याची चेतावणी देत आहेत." दरम्यान हा फक्त ट्रेलर आहे आणि येणाऱ्या काळात आम्ही यापेक्षा मोठे आंदोलन करणार असल्याचे ते म्हणाले.