आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अॅमेझॉनच्या ऑफिसमध्ये तोडफोड:अॅमेझॉनच्या तक्रारीवरुन राज ठाकरेंना कोर्टाने पाठवली नोटीस, कार्यकर्ते भडकले

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अॅमेझॉनला किंमत मोजावी लागेल- मनसे

राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आणि अॅमेझॉनदरम्यान मराठी भाषेवरुन वाद वाढताना दिसत आहे. दिंडोशी कोर्टाने अॅमेझॉनच्या याचिकेवर गुरुवारी मनसे प्रमुख राज ठाकरेंना नोटीस पाठवून 5 जानेवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांनी अॅमेझॉनच्या ऑफिसमध्ये तोडफोड केली. यावेळी त्यांनी अॅमेझॉनच्या बोर्डावरही काळं फासलं.

मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड सुरू असताना पुणे पोलिसांकडून अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आले. दरम्यान, कंपनीकडून अद्याप पोलिसात तक्रार देण्यात आली नाही. तर, मनसेकडून सांगण्यात आले आहे की, अॅमेझॉनच्या नोटिसीला मनसे कायद्याने उत्तर देणार.

अॅमेझॉनला किंमत मोजावी लागेल- मनसे

राज ठाकरेंना कोर्टाने नोटिस पाठवल्यानंतर मनसे नेते अखिल चित्र म्हणाले की, अॅमेझॉनला यायी किंमत मोजावी लागेल. महाराष्ट्रात अॅमेझॉनला मराठी भाषा मान्य नसेल, तर आम्हाला महाराष्ट्रात अॅमेझॉन मान्य नाही.

बातम्या आणखी आहेत...