आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी जेवायला येईल:चांगली कामे करा मी तुमच्या घरी जेवायला येईल; मनसे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी पक्ष प्रमुख राज ठाकरेंची ऑफर

पुणे2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जो शाखा अध्यक्ष चांगले काम करेल, त्याच्या घरी आपण स्वत: जेवायला जाणार आहोत, असे राज ठाकरे यांनी सोमवारी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितले. यामुळे मनसे शाखा अध्यक्षांमध्ये कमालीचा उत्साह निर्माण झाल्याचे दिसत आहे.

पुण्यातील आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. मनसे अध्यक्ष हे स्वत: तीन दिवसांसाठी पुणे दौऱ्यावर असून शहरातील सर्व विभागांमधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत. ठाकरे म्हणाले, प्रभाग अध्यक्ष ही नेमणूक रद्द करून शाखा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची नेमणूक केली जाणार आहे. तसेच जो शाखा अध्यक्ष चांगले काम करेल त्याच्या घरी आपण जेवण करण्यास जाणार आहोत. या बैठकीबद्दल शहराध्यक्ष वसंत मोरे म्हणाले, दर महिन्याला तीन दिवस पुण्यात येऊन राज ठाकरे आढावा घेणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...