आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभागात शांतता हवी:मनसे शहराध्यक्ष वसंत मोरेंनी धुडकावला राज ठाकरेंचा आदेश, भोंगे लावणार नसल्याचे केले स्पष्ट

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्याची खुप चर्चा झाली यात त्यांनी कार्यकर्त्यांना मशीदीवरील भोंगे न काढल्यास त्यासमोर भोंगे लावत हनुमान चालिसा लावा, असे आदेश दिले होते. यावर मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्या आदेशाचे पालन करणार नाही अशी भूमिका घेतली आहे. यावेळी बोलताना मला माझ्या प्रभागात शांतता हवी असल्याने असे कोणतेही पाऊल उचलणार नसल्याचे वसंत मोरे यांनी म्हटले आहे.

नेमके काय म्हणाले वसंत मोरे ?

माझ्या आणि साईनाथ बाबर यांच्या प्रभागात मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. निवडणुकीत ज्या गोष्टींचा परिणाम होईल, अशी कोणतीही गोष्ट मी करणार नाही. असे पुण्याचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. यावेळी बोलताना माझ्या प्रभागात शांतता कशी राहील, याकडे माझे लक्ष राहिल, कुणीही वेगळा प्रयत्न करणार नाही, असे म्हणत मोरेंनी राज ठाकरेंच्या भूमिकेला छेद दिला आहे. राज ठाकरेंच्या बोलण्याचा विपर्यास केला गेला. असे ही त्यांनी म्हटले आहे. रमजानचे दिवस आहेत, त्यामुळे शांतता पाळा, असा सल्ला वसंत मोरे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. मी राज ठाकरे यांच्यावर नाराज नाही. पण काय भूमिका घ्यावी, हे मला कळत नाही, अशी कबुली वसंत मोरे यांनी दिली आहे.

राज ठाकरेंच्या वक्तव्याने पुण्यात नाराजी

राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात केलेल्या वक्तव्यामुळे पुण्यातील मनसेचे काही कार्यकर्ते नाराज आहेत. पुण्यातील दोन पदाधिकाऱ्यांनी मनसेच्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर राज ठाकरे यांच्या भाषणानंतर अकोल्यातील शॅडो कॅबिनेटमधील आदित्य दामले यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी संभ्रम अवस्था आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...