आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात स्वागत:​​​​​​​अक्कलकोटहून मनसैनिक पायी निघाला राज ठाकरेंच्या भेटीला; 480 किलोमीटर करणार प्रवास

पुणे17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पायावर येत्या दिवसात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यांच्या दीर्घआयुष्यासाठी अक्कलकोट येथील एका मनसेचा सैनिक पायी वारी करत राज ठाकरे यांच्या भेटीसाठी मुंबईकडे निघाला आहे. या मनसैनिकाचे नाव नागेश नीलकंठ कुंभार असे आहे. गुरुवारी त्यांनी पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले आहे.

राज ठाकरे यांच्यावर प्रेम करणारे अनेक लोक राज्यासह देशभरात आहेत. तसेच त्यांचे भाषणाचे शौकीनही जगभरात आहेत. राज ठाकरे यांचे वक्तृत्व हे सर्वांना आकर्षित करणारे असेच आहे. मात्र काही दिवसांपासून राज ठाकरे पायदुखीच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यांच्या उत्तम आरोग्यसाठी कुंभार हे अक्कलकोट येथून पायी वारी करत मुंबईकडे निघाले आहेत. ते आज पुण्यात पोहोचले, यावेळी पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांनी त्यांचे फटाके वाजवत स्वागत केले.

24 जूनला मुंबईत दाखल

राज ठाकरे हे आपला विठ्ठल आहेत. त्या विठ्ठलाच्या भेटीसाठी आपण जात असल्याचे कुंभार यांनी यावेळी सांगितले. 9 जूनपासून कुंभार अक्कलकोट येथून मुंबईला जाण्यासाठी निघाले आहेत. मात्र, आपल्याला आता राज ठाकरे यांच्या भेटीची प्रतीक्षा लागली आहे असे त्यांनी सांगितले. अक्कलकोट ते राज ठाकरे यांचे निवस्थान असे 480 किलोमीटर असा प्रवास ते करणार आहेत. अक्कलकोटहून 9 जूनला निघालेले कुंभार 24 जूनला मुंबईत दाखल होतील असा दावा त्यांनी केला आहे. व्यवसायाने ट्रक ड्रायव्हर असलेल्या कुंभार यांना फक्त राज ठाकरे यांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी ही वारी केल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...