आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॅमरवर मनसेचे हॅमर:पुणे महापालिकेने दिव्यांग फळविक्रेत्याच्या वाहनाला लावला जॅमर, मनसेने हातोड्याने तोडला; व्हिडिओ जारी करून अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे खुले आव्हान

पुणे19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे महापालिकेने लावलेला जॅमर मनसेने हातोड्याने तोडून फळ विक्रेत्याला न्याय दिल्याचा दावा केला आहे. कडक निर्बंधांच्या काळात नुकतेच महानगरपालिकेने एका अपंग फळ विक्रेत्याच्या वाहनाला जॅमर लावला होता. ही गोष्ट नगरसेवक वसंत मोरे यांच्या निदर्शनास आली तेव्हा त्यांनी सोशल मीडियावर एक लाइव्ह व्हिडिओ अपलोड करून जॅमरला हातोड्याने फोडले आहे.

दंड भरण्याची तयारी असताना विलंब
फळ विक्री करणाऱ्या दिव्यांग व्यक्तीच्या गाडीला अतिक्रमण विभागाने जॅमर बसवला होता. गेल्या दोन, तीन दिवसांपासून ही व्यक्ती महापालिका कार्यालयाच्या चकरा मारत होती. दंड भरण्याची तयारी असतानाही कुणीही हे जॅमर काढण्यास तयार नव्हते असा दावा करण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी घटनास्थळी धाव घेत लाइव्ह व्हिडिओ जारी केला. तसेच हातोड्याने जॅमर तोडून वाहन मुक्त केले. यानंतर अधिकाऱ्यांना हवी ती कारवाई करा असे खुले आव्हान सुद्धा दिले.

सरकारी कामात अडथड्याची होऊ शकते कारवाई
पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे, हा सरकारी कामातील अडथळ्याचा प्रकार आहे. रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांच्या विरोधात महापालिकेकडून नेहमीच कारवाई केली जाते. यात दिव्यांग व्यक्तीला काही अडचण आली असेल तर त्याचा पाठपुरावा घेतला जाईल. परंतु, अशा प्रकारे महापालिकेचे जॅमर हातोड्याने तोडणे सरकारी कामात अडथळा आहे. कायद्यानुसार, त्याविरुद्ध कारवाई आणि दंड लावला जाऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...