आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरांचा डल्ला:पालखी सोहळ्यात मोबाइल चोरी करणार्‍या सराईताला पाठलाग करून पकडले

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्र्वर महाराज यांच्या पालखीचे आगमन झाले आहे. या सोहळ्यातच मोबाईलची चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला युनिट दोनच्या पथकाने पाठलाग करुन पकडले.

प्रेमराज राजेश पट्टपु (वय 22, रा. शिंदेवस्ती, हडपसर,पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्या चौकशीत त्याचा साथीदार दिपक उर्फ दिप्या (रा. देहुरोड,पुणे) यांच्या मदतीने साधु वासवाणी चौकाजवळ वुडलँड हॉटेल येथे मोबाईल हिसकावल्याचे सांगितले आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न असून प्रेमराजच्या ताब्यातून एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

कडक बंदोबस्त

पुणे शहरात पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त करण्यात आला आहे. त्याच अनुषंगाने युनिट दोनचे पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, पोलिस निरीक्षक वैशाली भोसले, उपिनीक्षक नितीन कांबळे पेट्रोलिंग करत असताना त्यांना एकजण संशयीतरित्या फिरत असल्याचे आढळले. त्यानंतर त्यांच्याकडे चौकशी करण्यात येत असताना तो पळून जात असताना त्याला पाठलाग करुन पकडले.