आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामोबाइल शॉपी फोडून लाखो रुपयांचा एेवज चाेरणाऱ्या सराईत परप्रांतीय टोळीला हडपसर पोलिसांनी बिहारमधून अटक केली. त्यांच्याकडून पाच मोबाइल शॉपी व घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून २२ लाखांचा ऐवज जप्त केला. त्यामध्ये ९७ मोबाइलचा समावेश आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी दिली.
साहिल मोरे (२०, रा. देशमुखवाडा शिवणे, पुणे) संकेत निवगुणे (२२, रा. बानगुडे चाळ, वारजे माळवाडी, पुणे), लक्ष्मण जाधव (३४, रा. हॅप्पी कॉलनी, गोसावी वस्ती, कोथरूड, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
उरळी देवाची परिसरातील न्यू साई मोबाइल दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी १९ लाख रुपयांचे १०२ मोबाइल चोरी केल्याची घटना २३ ऑक्टोबरला घडली होती. हडपसर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्यांच्या मोटारीची माहिती काढली. पोलिस अंमलदार शाहीद शेख आणि अतुल पंधरकर यांना मिळालेल्या माहितीनुसार संशयित साहिल मोरे याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने संकेत निवगुणे, लक्ष्मण ऊर्फ अण्णा संतोष मोरे, गजानन मोरे, पोपट धावडे यांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी निवगुणे याला ताब्यात घेत लक्ष्मण जाधवला बिहारमधून उचलले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.