आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापादचाऱ्या नागरिकांचे मोबाईल हिसकावून जबरी चोऱ्या करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली आहे. त्यांच्याकडून सहा मोबाईल, दुचाकी असा १ लाख ५६ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अदित्य प्रशांत साळवे( वय -१९ , रा. स. नं. २५, राजेन्द्र प्रसाद शाळेचे पाठीमागे, जयविजय चौक, बोपोडी ,पुणे), सचिन अशोक केंगार( वय -१९ , कमळाबाई बहिरट चौक, सम्राट नगर, बोपोडी,पुणे) अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत.
गुन्हे शाखेचे युनिट एकचे अधिकारी आणि कर्मचारी हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार अभिनव लडकत यांना मोबाईल मार्केटमध्ये बुधवार पेठत मोबाईल चोरट्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून दोघांना अटक केले आहे. त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे.त्यांच्याकडुन सहा मोबाईल व चोरी करताना वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे.ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदिप कर्णिक , उपायुक्त अमोल झेंडे , एसीपी सुनिल पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील,एपीआय आशिष कवठेकर, पोलीस उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी, राहूल मखरे, अभिनव लडकत, अनिकेत बाबर, शशिकांत दरेकर, दत्ता सोनावणे, निलेश साबळे, अमोल पवार, अय्याज दड्डीकर, विठ्ठल साळुंखे शुभम देसाई, रुक्साना नदाफ, तुषार माळवदकर यांनी केली आहे.
भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार
भरधाव वाहन चालकाने पाठीमागून धडक दिल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. हा अपघात २९ एप्रिलला पुणे-सोलापूर रस्त्यावरील कदमवाक वस्तीच्या हद्दीत घडला.
दादासाहेब अशोक भोरकडे (वय ३२ रा. कोंढवे-धावडे,पुणे )असे ठार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार योगेश पाटीलय यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दादासाहेब २९ एप्रिलला कदमवाक वस्ती परिसरातून दुचाकीवर प्रवास करीत होता. त्यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव वाहनचालकाने त्याला धडक दिली. खाली पडल्यामुळे गंभीररित्या जखमी झालेल्या दादासाहेब रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर तपास करीत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.