आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहोळी आणि धूलिवंदननिमित्त हडपसर परिसरातील अमानोरा माॅलमध्ये सनबर्न होळी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पार्टीत मोठ्या संख्येने तरुण-तरुणी सहभागी झाले होते. उच्च क्षमतेची ध्वनिवर्धक यंत्रणा वापरण्यात आली होती. या पार्टीत मद्यप्राशन करून बेधुंद नृत्य करणाऱ्या तरुणांकडील मोबाइल मोठ्या प्रमाणात लांबवल्याचे समोर आले आहे.
पार्टीनंतर रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडे मोबाइल चोरीच्या तक्रारी येत होत्या. याप्रकरणी आतापर्यंत २१ तक्रारी दाखल झाल्या आहेत. मात्र, मोबाइल चोरीचा आकडा ८० ते ९० च्या घरात असण्याची शक्यता आहे. एका संशयितालादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी दिली.
खासगी इव्हेंट कंपनीकडून आयोजन
दरम्यान, खासगी इव्हेंट कंपनीकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सनबर्न होळी महोत्सव या नावाखाली हा कार्यक्रम भरवण्यात आला होता. मोठ्या प्रमाणात जाहिरात करून या कार्यक्रमाची साडेतीन हजार रुपयांपर्यंत तिकीट विक्री करण्यात आली होती. उच्चभ्रू तरुण-तरुणी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. डीजेच्या तालावर मद्याच्या ठेक्यात थिरकत असताना चोरट्यांनी मोबाइल चोरी केले. दोन हजारांपेक्षा अधिक तरुण-तरुणी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.