आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरांचा सपाटा:बनावट कागदपत्रांद्वारे मोबाइल टॉवरचे साहित्य चोरणारी टोळी जेरबंद; 6 जिल्ह्यात 10 गुन्हे उघडकीस

पुणे17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बनावट कागदपत्रे आधारे बंद अवस्थेत असलेले मोबाइल टॉवर हेरुन टॉवरचे साहित्य चोरणार्‍या एका टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून १३ लाखांचा मुद्देमाल जप्त करून सहा जिल्ह्यातील दहा चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलीस पथकाला यश आले आहे. टोळीमध्ये टॉवर कंपनीतील दोन अधिकार्‍यांचा सहभाग असल्याचेही निष्पन्न झाले आहे अशी माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली आहे.

रमेश मल्लाप्पा गरसंगी (वय -३३ रा. मळघन ता बसवन बागेवाडी जि.विजयपुरा कर्नाटक) प्रशांत वामन यादव (वय -३१ रा.वडकी ता. हवेली मूळ रा. हर्णे ता. पुरंदर,पुणे), सुहास श्रीराम लाड (वय ४० रा.मांजरी बु ) जावेद हमीदुल्ला खान (वय- ३३ रा. भेकराईनगर, फुरसुंगी,पुणे ) आणि सचिन गणपत कदम (वय -४१ रा. कोंढवा,पुणे) अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत.

बनावट कागदपत्राद्वारे जी. टी. एल. इन्फ्रान्स्ट्रक्चर कंपनीच्या रांजणगावातील पाचंगे वस्ती परिसरातून बंद अवस्थेतील मोबाईल टॉवरची चोरीची घटना २८ जानेवारी रोजी घडली होती. चोरट्यांनी सुमारे १५ लाखांचे साहित्य चोरुन नेले होते. गुन्हयाची व्याप्ती मोठी असल्यामुळे गुन्हयाचा पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून केला जात होता. पथकाने तांत्रिक विश्लेषणाचा आधारे आरोपींना कर्नाटक राज्यातून आणि पुणे जिल्हा परीसरातून पाचजणांना ताब्यात घेतले.

पोलीस चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून १३ लाख ५० हजारांचा ऐवज जप्त केला आहे . त्यांनी जी. टी. एल. कंपनीचे सातारा, रत्नागिरी, सांगली, पुणे, बीड, रायगड अशा सहा जिल्हयातील दहा मोबाईल टॉवरची चोरी केल्याची कबुली दिली आहे.

अटक केलेल्या टोळीत जी.टी.एल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीत काम करणार्‍या दोघा अधिकार्‍यांचा सहभाग आहे. २००८ मध्ये कंपनी बंद झाल्यानंतर संबंधित मोबाइल टॉवरची चोरीचा कट त्यांनी रचला. त्यानंतर इतर साथीदारांच्या मदतीने चोर्‍या केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, एपीआय गणेश जगदाळे, अभिजीत सावंत, तुषार पंदारे, सचिन घाडगे, राजु मोमीन, मंगेश थिगळे, जनार्दन शेळके, चंद्रकांत जाधव, अजित भुजबळ, हनुमंत पासलकर, हेमंत विरोळे, अक्षय सुपे यांनी केली आहे.