आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे शहरातील वानवडी परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत नवले टोळीविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. टोळीने कोयता,जीवघेण्या हत्यारांसह गंभीर दुखापत करुन दंगा करणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, खुन करणे, दहशत निर्माण करण्याचे गंभीर गुन्हे केले आहेत. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्कानुसार केलेली ही 84वी कारवाई आहे.
सचिन संजय नवले (वय २७ रा. फुरसुंगी) कुमार उर्फ गोट्या बलभिम लोहार (वय २६ रा. काळेपडळ, हडपसर), रोहन उर्फ भैय्या अनिल देडगे (वय २५ रा. रामटेकडी, हडपसर), आकाश दत्ताञय कोठावळे (वय २५ रा. काळेपडळ), राहुल हरी घडाई ऊर्फ कोळी (वय २३ रा. फुरसुंगी), आकाश उमेश कसबे (वय १९ रा. फुरसुंगी), ओमकार ईश्वर सुपेकर (वय २१ रा. हडपसर), मयुर राजु सकपाळ (वय २४ रा. काळेपडळ), शाम दत्तात्रय सरक (वय २० रा. काळेपडळ)अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत.
सराईत नवले टोळीने वानवडी, हडपसर परिसरात कोयता, जीवघेण्या हत्यारांसह गंभीर दुखापत करणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, खुन करणे, दहशतीसाठी गंभीर गुन्हे केले आहेत. त्यांच्याविरूद्ध मोक्कानुसार कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक लगड यांनी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्फतीने अपर आयुक्त नामदेव चव्हाण यांना सादर केला. संबंधित प्रस्तावाला मंजूरी देउन मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास एसीपी राजेंद्र गलांडे करीत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.