आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील विमानतळ, येरवडा आणि चंदननगर परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत रोहन गायकवाडसह आठ साथीदारांविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्कानुसार केलेली ही 85 वी कारवाई आहे. रोहन अशोक गायकवाड (वय २५ रा. कलवड वस्ती, लोहगाव,पुणे) याच्यासह आठ साथीदारांविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे.
टोळीचे वर्चस्व आणि दहशत प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी विमानतळ येरवडा चंदननगर परिसरातील नागरिकांमध्ये दहशत माजविली होती. खूनाचा प्रयत्न, दुखापत, गंभीर दुखापत, जबरी चोरी, घरफोडी, बेकायदेशीर घातक शस्त्रे बाळगणे असे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याविरूद्ध मोक्कानुसार कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव यांनी पोलिस उपायुक्त रोहीदास पवार यांच्यामार्फतीने अपर आयुक्त नामदेव चव्हाण यांना सादर केला. ही कामगिरी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदिप कर्णिक, उपायुक्त रोहीदास पवार, एसीपी किशोर जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव, पोलिस निरीक्षक मंगेश जगताप यांनी केली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.