आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारी वृत्‍त:ढेकण्या वाघमारे टोळीवर मोक्काचा बडगा

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संघटित गुन्हेगारी करून चतुःशृंगी ठाण्याच्या हद्दीत दहशत निर्माण करणारा सराईत रोहित ऊर्फ प्रेम ऊर्फ ढेकण्या राहुल वाघमारे (१९, रा. औंध, पुणे) याच्यासह त्याच्या सात साथीदारांविरुद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. रोहित ऊर्फ प्रेम ऊर्फ ढेकण्या राहुल वाघमारे (१९), शुभम गायकवाड (२५), अनिकेत राजू पवार (१९), नयन संजय लोंढे (१९), आदित्य सचिन वाघमारे (१९), अमित नारायण साबळे अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत. त्यामध्ये दोन अल्पवयीन गुन्हेगारांचाही समावेश आहे.

पुणे शहरातील सराईत गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध मोक्कास्त्र उगारत पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगारांचे कंबरडे मोडले आहे. त्याचसोबत शहरात कायदा आणि सुव्यवथा टिकून राहावी यादृष्टीने पोलिस प्रयत्न करत आहेत. दहशत, खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण करणाऱ्या टोळींचा बिमाेड झाल्यामुळे गुन्हेगारीचा आलेखही उतरत असल्याचे दिसून येऊ लागले आहे. ढेकण्या टोळीविरुद्ध मारामारी करणे, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे, जिवे मारण्याची धमकी देणे, वाहनांची तोडफोड केल्याचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याविरुद्ध मोक्कानुसार कारवाईचा प्रस्ताव चतुःशृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांनी उपायुक्त रोहिदास पवार यांच्यावतीने अपर आयुक्त नामदेव चव्हाण आणि पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना पाठवला. प्रस्तावाची पडताळणी करून टोळीविरूद्ध मोक्का कारवाई करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...