आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंडणी:तोतया पत्रकारांच्या टोळीवर मोक्का ; अमिताभ गुप्ता यांचे कारवाई करण्याचे आदेश

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पत्रकार असल्याच्या बतावणीने मुंढवा भागातील एका व्यापाऱ्याकडून खंडणी उकळणाऱ्या तोतया पत्रकारांच्या टोळीविरोधात पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले. याप्रकरणी योगेश प्रकाश नागपुरे (३५), प्रमोद अजित साळुंखे (२५, रा. खराडी), वाजिद अश्फाक सय्यद (२५, क्रांती पार्क, खराडी), मंगेश बाळासाहेब तांबे (२८, रा. खराडकर पार्क, खराडी), लक्ष्मणसिंग ऊर्फ हनुमंता छत्तरसिंग तंवर (३५, रा. हेवन बिल्डिंग, मांजरी) आणि एका महिलेच्या विरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार योगेश नागपुरे आणि महिलेला अद्याप अटक करण्यात आली नाही. नागपुरेच्या विरोधात खडक, मुंढवा, हडपसर, बंडगार्डन पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, खंडणी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी साळुंखेने पत्रकार असल्याची बतावणी एका व्यापाऱ्याकडे केली होती. सहायक आयुक्त बजरंग देसाई पुढील तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...