आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:मोदीभक्ताने पुण्यात उभारले नरेंद्र मोदींचे मंदिर; सोशल मीडियावर ठरत आहे चर्चेचा विषय

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशभरात लाखाे चाहते असून मोदींवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी ते वेगवेगळया गोष्टी करताना आपणास पाहावयास मिळते. मात्र, पुण्यातील मोदी यांच्या एका भक्ताने चक्क त्यांचे मंदिरच बांधत त्यात नरेंद्र मोदी यांचा अर्धाकृती पुतळा बसवल्याने सध्या तो चर्चेचा विषय ठरू लागला आहे. भारतीय जनता पक्षाचे औंध येथील कार्यकर्ते मयूर मुंडे यांनी औध परिसरात स्वत:च्या मालकीच्या खासगी जागेत हे मंदिर उभारले असून मोदींचा पुतळा असलेले हे पहिलेच मंदिर असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

मोदींच्या कार्यावर आधारित काव्याची रचना करून ती मोठ्या फलकावर दर्शनी भागात लावलेली आहे. मोदी यांच्याकडून आपणास प्रेरणा मिळते त्यामुळे कोणी आपणास मंदिरावरून सोशल मीडियावर ट्रोल केले तरी चालेल पण मोदी यांच्याविषयी आपणास निष्ठा आहे.. मागील २० वर्षांपासून मी भाजपचे काम करतो, मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित मुद्द्यांवर धडक निर्णय घेऊन कायमस्वरूपी मार्गी लावले आहेत असे मुंडे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...