आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान मोदी देहूनगरीत:संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे केले लोकार्पण, सोहळ्यासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी

पुणे21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुण्यातील लोहगाव विमानतळावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले. त्यानंतर मोदी यांच्या हस्ते देहूतील संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मोदींनी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, विठ्ठल-रुख्मिणी यांचे दर्शन घेतले. लोकार्पण सोहळ्यासाठी वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे.

पुण्यातील लोहगाव विमानतळावर उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी मोदींचे स्वागत केले.
पुण्यातील लोहगाव विमानतळावर उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी मोदींचे स्वागत केले.

तुकारामांनी भागवत धर्माला जागृत केले

यादव साम्राज्य संपल्यानंतर संपूर्ण समाज छिन्नविछिन्न झाला होता. कर्मकांड, बुवाबाजीचे स्तोम माजले होते. शोषण सुरू होते. त्यावेळी भागवत धर्माची पताका हाती घेऊन संतांनी महाराष्ट्र धर्माला जागृत केले. ज्ञानेश्वर माऊलींनी पाया रचला. त्याचा कळस तुकाराम महाराज झाले, असे मत यावेळी फडणवीसांनी व्यक्त केले.

सभेसाठी वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे.
सभेसाठी वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे.

400 वारकऱ्यांसोबत लोकार्पण सोहळा

नरेंद्र मोदी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत हेलिकॉप्टरने देहूत आले. यासाठी झेंडे मळा येथे 3 हेलिपॅड तयार करण्यात आले. तेथून मोटारीने माळवाडी, परंडवाल चौक, मुख्य कमान मार्गाने ते 14 कमानीजवळ पोहोचले. तेथून ते पायी मंदिराजवळ गेले. येथे 400 वारकऱ्यांसमवेत शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्यानंतर मोदींनी सभेला संबोधित केले.

सुरक्षिततेसाठी सभास्थळी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
सुरक्षिततेसाठी सभास्थळी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
देहूत होण्याऱ्या मोदींच्या कार्यक्रमासाठी भाजप नेतेही देहूत दाखल झाले आहेत.
देहूत होण्याऱ्या मोदींच्या कार्यक्रमासाठी भाजप नेतेही देहूत दाखल झाले आहेत.

पीएमपीकडून 20 ई-बसेस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहू गावातील तुकोबांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा झाला. यानंतर देहू येथील माळवडी येथे पंतप्रधानांची सभा झाली. पण, सभास्थळ ते वाहनपार्किंग हे अंतर साधारण दीड किलोमीटर अंतर आहे. त्यामुळे नागरिकांना सभास्थळी जाण्यासाठी पीएमपीच्या 20 ई-बस सोडण्यात आल्या होत्या.

संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यासाठी मोदी देहूनगरीत दाखल झाले आहेत.
संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यासाठी मोदी देहूनगरीत दाखल झाले आहेत.

रस्ते वाहतुकीसाठी बंद

-पुणे-मुंबई महामार्गावरील देहूरोड ऑर्डनन्स फॅक्‍टरी कमानीपासून देहू गाव रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. -निगडीतील भक्ती शक्ती चौक- तळवडे- कॅनबे चौक पर्यायी रस्ता. -तळेगाव चाकण रस्त्यावरील देहू फाटा ते परंडवाल चौक मार्ग वाहतुकीसाठी बंद. -देहू कमान ते 14 टाळकरी कमानपर्यंत रस्ता बंद राहील. -साईराज चौक- सांगुर्डी फाटा- परंडवाल चौक- भैरवनाथ चौक ते मुख्य मंदिर रस्ता बंद.

मोदी-उद्धव ठाकरे एकाच मंचावर

देहूतील कार्यक्रम झाल्यानंतर नरेंद्र मोदी मुंबईत येणार आहेत. यावेळी राजभवनातील क्रांतिकारी गॅलरीचे उद्धाटन मोदींच्या हस्ते होणार आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे मोदी आणि उद्धव ठाकरे आज एकाच मंचावर दिसणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...