आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाईत जनतेची होरपळ:महागाईवर नियंत्रणासाठी सर्व मुख्यमंत्र्यांची मोदींनी बैठक घ्यावी, खासदार सुप्रिया सुळे यांची पुण्यात मागणी

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महागाई वाढणार असल्याचे तज्ज्ञ सांगत होते. परंतु केंद्राने कोणाचेही मत एेकले नाही व त्यामुळे आज सर्वसामान्य लाेक महागाईत होरपळत आहेत. पंतप्रधानांनी आता सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून महागाईवर नियंत्रण मिळावावे आणि सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.

पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शनिवार चौक मारुती मंदिर याठिकाणी वाढत्या महागाई विरोधात, गॅस, इंधन दरवाढी विरोधात बुधवारी आंदाेलन केले. त्यावेळी त्या बाेलत होत्या. प्रवक्ते अंकुश काकडे, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदेश प्रतिनिधी प्रदीप देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. सुळे म्हणाल्या, आज एक लिंबू १० रुपयांना मिळत आहे. उत्तर प्रदेशात एक रुपयाला लिंबू असेल तर आपण एक ट्रक लिंबू मागवू, परंतु, डिझेलचे भाव इतके की ते परवडणार नाही, असेही त्या म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...