आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

14 वर्षीय मुलाचे हृदय धडधडले:समवयीन ब्रेनडेड मुलीचे हृदय मिळाले मोहद अन्सारीला; प्रत्यारोपण यशस्वी

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सैन्यदलात सेवा बजावून निवृत्त झालेल्या मन्सुरी कुटूंबीयातील अवघ्या चाैदा वषार्च्या मुलाचे ह्रदय निकामी झाले व ताे गेल्या 18 महिन्यांपासून ह्रदयाच्या प्रतीक्षेत हाेता. मात्र, दुसरीकडे 14 वर्षीय ब्रेन डेड मुलीचेही ह्रदय उपलब्ध झाले आणि जुळलेही त्यानंतर हृदय प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया ३० मे रोजी सशस्त्र सैन्यदलाच्या रुग्णालयात करण्यात आली आहे.

ह्रदय प्रत्याराेपणाची ही शस्त्रक्रिया प्रथमच सशस्त्र सैन्यदल रुग्णालयातील (आमर्ड फाेर्सेस मेडिकलकाॅलेज) ‘आर्मी इन्स्टिटयूट ऑफ कार्डिओ थाेरॅसिस सायन्सेस’ (एआयसीटीएस) या ह्रदयशल्यचिकित्सा करणाऱ्या विभागात झाली आहे. ‘एआयसीटीएस’ हे सैन्यदलाचे सहासे खाटांचे हाॅस्पिटल आहे. माेहद फरदीन अन्सारी या 14 वर्षाच्या मुलाला थकवा आणि दम लागत असल्याने दाेन वषापूर्वी त्याला येथेच उपचारासाठी दाखल केले हाेते. उपचारानंतरही बरे वाटत नसल्याने काही काळानंतर त्याचे ह्रदय निकामी झाल्याचे निदान झालेआणि त्याचे कुटूंबीय चिंतेत पडले. ह्रदय मिळण्यासाठी 18 महिन्यापूर्वी त्याची नाेंद केली हाेती.

या अडचणींवर केली मात

एकतर माेहदचे वय कमी. त्यातच त्याच्या वयाचा, रक्तगटाचा, वजनाचा आणि प्रवासाच्या दृष्टीने जवळपास असलेला दाता मिळणे हे आव्हान हाेते. त्यामुळे त्याला ह्रदय मिळेल की नाही ही चिंता हाेती. दरम्यान सहयाद्री हाॅस्पिटलमध्ये रस्ता अपघातात डाेक्याला जखम झालेली एक 14 वर्षीय मुलगी उपचार घेत असताना तिला डाॅक्टरांनी ब्रेनडेड जाहीर केले. तिचे ह्रदय माेहदला वैद्यकीयदृष्टया जुळले.

अकरा मिनिटांत पाेहचवले ह्रदय

सहयाद्री हाॅस्पिटल ते एआयसीटीएसचे अंतर 7 किमी असून त्यासाठी सर्वसाधारणपणे दिवसा अर्धा तास पाेचायला लागताे. मात्र, 30 मे राेजी सकाळीच वाहतुक पाेलिसांनी केलेल्या ग्रीन काॅरिडाॅरमुळे हे ह्रदय अवघ्या 11 मिनिटांत पोहचवले व मोहदवर प्रत्याराेपित करण्यात आले. चौदा वर्षीय ब्रेनडेड मुलीने तिच्याच वयाच्या एका मुलाचा जीव वाचवला. या मुलीचे यकृत, किडनीही दान करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...