आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्करच्या अजून एका हस्तकाला अटक:अतिरेकी संघटनेशी संबधित मोहम्मद जुनैदची न्यायालयीन कोठडीत रवानगी; पुणे न्यायालयाचे आदेश

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लष्कर-ए-तोयबा या बंदी घालण्यात आलेल्या जम्मू-काश्मीरमधील अतिरेकी संघटनेशी संबंधीत असल्याच्या कारणावरुन मोहम्मद जुनैद मोहम्मद याला पुणे दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली, यानंतर त्याची रवानगी 14 दिवसीय पोलिस कोठडीत करण्यात आली. आज त्याची पोलिस कोठडी संपुष्टात आल्यानंतर त्यास अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांचे न्यायालयात हजर केले असता, त्यास 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.

एटीएसतर्फे न्यायालयात सरकारी वकील विजय फरगडे यांनी आरोपीस 14 दिवस न्यायालयीन कोठडी मिळावी अशी मागणी मंगळवारी केली. एटीएसने सदर गुन्हयाचा तपास सुरु आहे. दाखल गुन्हयाचे अनुषंगाने साक्षीदार लोकांकडे तपास करुन त्यांचा सविस्तर जबाब नोंदविण्याचे काम चालू आहे. दाखल गुन्हयातील अटक आरोपी याचे सोशल मिडिया अकाऊंटचा डेटा मोठ्या प्रमाणात असून त्याचे विश्लेषणाचे काम चालू आहे. तसेच सदर गुन्हयातील आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरु असल्याची माहिती एटीएसचे सहाय्यक पोलिस आयुक्त अरुण वायकर यांनी न्यायालयात दिली आहे.

याप्रकरणात आरोपी मोहम्मद जुनैद याच्याकडील तपासाच्या चौकशीत पोलिसांनी जम्मू काश्मीरमधील पलमार किश्तवाड येथून सुतारकाम करणारा व लष्कर ए तोयबाचा हस्तक आफताब हुसेन अब्दुल जब्बार शाह (वय-२८) याला ही दोन जून रोजी अटक केली असून त्याची पोलिस कोठडी 14 जूनपर्यंत आहे.

बातम्या आणखी आहेत...