आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:सराईत गुन्हेगार गंग्या आखाडे टोळीविरुद्ध मोक्का कारवाई

पुणे5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वारजे माळवाडी परिसरात संघटित गुन्हेगारी करून दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गंग्या आखाडे टोळीविरुद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. टोळी प्रमुख गंग्या ऊर्फ विकी विष्णू आखाडे (२४, रा. वारजे माळवाडी), चैतन्य रुक्मीदास ढाले (१८ रा. पर्वती ) अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या इतर फरार साथीदारांचा शोध सुरू आहे.

वारजे माळवाडी परिसरात सराईत गंग्या आखाडे याने साथीदारांच्या मदतीने खुनाचा प्रयत्न, दरोडा, मालमत्तेचे नुकसान करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, शस्त्र जवळ बाळगणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याविरुद्ध वेळोवेळी कारवाई करूनही वर्तनात सुधारणा होत नव्हती.

बातम्या आणखी आहेत...