आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर शिवाजीनगर भागात पाटील इस्टेट परिसरात दहशत माजविणाऱ्या इराणी गुंड टोळीच्या विरुद्ध पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले अशी माहिती पोलिसांनी शनिवारी दिली आहे. पोलिस आयुक्तांनी केलेली ही मोक्काची 24 वी कारवाई आहे.
जमीर कंबर इराणी (वय 23), कासीम आबालू इराणी (वय 23), मोहमद शौकत शेख (वय 30),जैनब फिदा इराणी (वय 21),मेहंदीहसन कंबर इराणी (वय 30), शहजादी उर्फ मुथडी जावेज इराणी (वय 43), सोगरा उर्फ नरगिस समीर इराणी (वय -24, सर्व रा. महात्मा गांधी वसाहत, जुना मुंबई-पुणे रस्ता, पाटील इस्टेट परिसर,पुणे) अशी मोक्का कारवाई केलेल्या आरोपीची नावे आहेत. इराणी टोळीने पाटील इस्टेट परिसरात मागील काही दिवसांपासून दहशत माजविली होती.
याप्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात संबधित आरोपींच्या विरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला होता.आरोपी नादर चंगेज इराणी ( टोळी प्रमुख) याने त्याचेसह अन्य सदस्यांसाठी आपले अधिपत्याखाली प्रत्येक गुन्ह्यात काही सामाईक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेऊन स्वतःची संघटीत टोळी करून गुन्हे केलेले असुन त्यांनी अवैध मार्गान अर्थिक फायदा मिळवण्याच्या उद्देशाने जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे गंभीर दुखापत करणे, जबरी चोरी करणे, नागरीकांच्या मालमत्तेच तोडफोड करुन नुकसान करणे सर्वसामान्य नागरीकांच्या मध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करणे, बेकायदेशीर शस्त्र जवळ बाळगणे पोलिसांच्या आदेशाचा भंग करणे, बेकादेशीर जमाव जमविणे या सारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे वांरवार केले आहेत.
सदर टोळीच्या विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव खडकी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील, उपनिरीक्षक वैभव मगदूम, राजकिरण पवार, रमेश जाधव यांनी तयार केला हाेता.खडकी पोलिसांनी अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याकडे संबधित प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता.या प्रस्तावाची पडताळणी करुन पोलिस आयुक्तांनी इराणी टोळीच्या विरुद्ध मोक्का कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.