आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील वारजे परिसरातील सराईत गँगविरूद्ध मोक्का:पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून कारवाई, आरोपींना अटक

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडविणार्‍या कोयता गँग टोळीविरूद्ध पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्कानुसार कारवाई बडगा गुरुवारी उगारला आहे. संबंधित टोळीने जुन्या वादातून तरूणाला मारण्याचा प्रयत्न करीत वारजे परिसरात कोयते हातात घेउन दशहत माजविली होती.

वैभव ऊर्फ पप्या शांताराम उकरे (रा. वडारवस्ती, कर्वेनगर,पुणे), आशितोष नारायण साठे ( रा. मु. पो. कुळे, ता. मुळशी, जि. पुणे सध्या कर्वेनगर,पुणे), गणेश उत्तम माने (वय 22 रा. आकाशनगर, वारजे, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ते सध्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात आहेत.

काय आहे प्रकरण?

टोळक्याने 27 नोव्हेंबरला जुन्या वादातून तरूणाला जीवे मारण्याच्या हेतूने डोक्यात दगड मारण्याचा प्रयत्न केला. मारलेला दगड तरूणाने चुकवल्याचा राग पप्या उर्फ वैभव उकरे याला आला. त्याने दगड मोटार सायकलवर मारून नुकसान केले होते. टोळीतील एकाने हातातील कोयता हवेत फिरवून दहशत माजवित ‘पप्पुभाई हा इथला भाई आहे’ असे म्हणुन ‘पप्पु भाईच्या नादाला लागाल तर खल्लास करून टाकेन' असे म्हणून परिसरात दहशत पसरविली होती.

याप्रकरणी आरोपी वैभव ऊर्फ पप्या शांताराम ऊकरे (टोळी प्रमुख) हा प्रत्येक गुन्हयामध्ये नवीन साथीदार घेउन गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार संबंधित टोळीविरूद्ध मोक्कानुसार कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी. एस. हाके यांनी उपायुक्त सुहैल शर्मा यांच्यावतीने अपर पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे यांना सादर केला. प्रस्तावाची छाननी केल्यानंतर आरोपी वैभव ऊर्फ पप्या शांताराम ऊकरे याच्यासह टोळीविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...