आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुहा गँग प्रमुखासह साथीदारांविरूद्ध मोक्का:पुणे पोलिस आयुक्तांची गुन्हेगारांविरोधात 93 वी कारवाई

पुणे22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे शहरातील कायदा सुव्यवस्था सुरळित राखण्यासाठी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का कारवाईचा बडगा कायम ठेवला आहे. भारती विद्यापीठ परिसरात दहशत माजविणाऱ्या सराईत चुहा गँग टोळीप्रमुखासह त्याच्या दोन साथीदारांविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत करण्यात आलेली ही 93 वी मोक्का कारवाई आहे.

ईस्माईल मौलाली मकानदार (वय 26, चुहा गँग टोळीप्रमुख) जावेद मेहबुब मुल्ला (वय 27) तौसिफ उर्फ मोसिन उर्फ चुहा जमीर सैय्यद (वय 28, सर्व रा. संतोषनगर,कात्रज,पुणे) अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सराईत ईस्माईल मकानदारने प्रत्येक गुन्ह्यावेळी दोन साथीदार घेऊन परिसरात दहशत माजविली होती.

खुनाचा प्रयत्न, खंडणी,बेकायदेशिर हत्यार बाळगणे, बेकायदेशीर जमाव जमविणे, दहशत माजविण्याचे गंभीर गुन्हे केले आहेत. याप्ररकणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी पोलीस उपायुक्त सागर पाटील यांच्यावतीने चुहा गँगविरूद्ध मोक्का कारवाईचा प्रस्ताव दाखल केला होता.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी प्रस्तावाला मंजूरी दिली. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त राजेंद्र डहाळे, उपायुक्त सागर पाटील, एसीपी सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, सव्र्हेलन्स पथकाचे एपीआय वैभव गायकवाड, अमलदार चंद्रकांत माने, महेश बारवकर, निलेश ढमढेरे, तुळशीराम टेंभुर्णीकर यांनी केली.

विसर्जनानंतर युवक बेपत्ता

सोमवार पेठ परिसरात कुटुंबीयांसह विसर्जनासाठी गेलेला सतरा वर्षीय युवक बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पियुष चंद्रकांत थोरात (वय 17) असे बेपत्ता झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत त्याची आई मनीषा चंद्रकांत थोरात (वय 45, रा. मंगलमूर्ती रस्ता, रास्ता पेठ,पुणे) असे बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव आहे.

विसर्जनाच्या दिवशी पियुष कुटुंबीयांसह सोमवार पेठेतील शाहू उद्यान परिसरात गेला होता. त्यानंतर तो तेथे नसल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. त्याची तब्येत बरी नसल्याने तो घरी गेला असावा, असे त्याच्या कुटुंबीयांना वाटले. त्यानंतर कुटुंबीय घरी गेले. तेव्हा पियुष घरी नसल्याचे लक्षात आले. त्याचा शोध घेण्यात आला. मित्रांकडे चौकशी करण्यात आली. त्याचा ठावठिकाणा न लागल्याने त्याच्या आईने पोलिसांकडे तक्रार दिली. याबाबत पोलीस उपनिरीक्षक मीरा त्र्यंबके पुढील तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...