आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्वासाने दिलेले पैसे हडपले:पाच लाखांचा अपहार करून फरार झालेला आरोपी जेरबंद

पुणे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कामानिमित्ताने उधार घेतलेले एका व्यक्तीचे पैसे त्याला परत करण्यासाठी व्यावसायिकाने त्याच्या साथीदारास दिले. मात्र या 5 लाख रुपयांचा अपहार करुन पाच महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीस लोणी काळभोर पोलीसांच्या तपास पथकाने शिताफीने अटक केली आहे. याप्रकरणी अश्रफ अमजद सय्यद (वय 29, रा. वाघेश्वर नगर, गोरेवस्ती वाघोली पुणे) याला अटक करण्यात आली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 फेब्रुवारी रोजी रात्री पावणेआठ वाजण्याच्या सुमारास निखील गुलाब कुंजीर (वय 22, रा. कुंजीरवाडी, ता. हवेली,पुणे) यांनी त्यांच्या ओळखीचे अश्रफ सय्यद याला विश्वासाने 5 लाख रुपये पोपट भोलाजी ढवळे (रा. मगरपट्टा हडपसर पुणे) यांना देण्यासाठी दिले होते. परंतु सय्यद याने सदर रक्कम ढवळे यांना न देता या रक्कमेचा अपहार केला. तेव्हापासून तो फरार झाला. याप्रकरणी कुंजीर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

बातमीदारामार्फत लागला शोध

फरार आरोपींचा शोध घेत असताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेद्र मोकाशी यांनी तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक अमित गोरे व पोलिस अंमलदार यांना सूचना दिल्यानंतर सदर फरारी आरोपीचा शोध सुरू करण्यात आला होता. शनिवारी तपास पथकातील पोलीस हवालदार देविकर व वीर त्यांच्या बातमीदारामार्फत स्वत:ची ओळख लपवून फरारी असलेला सय्यद हा वाघोली येथे येणार असल्याची माहिती मिळाली.

असा रचला सापळा

त्यानुसार पोलिसांनी माहितीची खातरजमा केली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, पोलीस हवालदार संभाजी देविकर, अमित साळुंखे, बाजीराव वीर, शैलेश कुदळे, निखील पवार यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेष करून सदर ठिकाणी जाऊन सापळा रचला. मिळालेल्या माहितीनुसार सय्यद हा त्याठिकाणी दिसुन आला. पोलीसांची चाहुल लागताच तो तेथुन पळुन जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन शिताफीने पकडले. चौकशीत त्यांने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे. पुढिल तपास पोलीस उपनिरीक्षक देशमुख करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...