आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

16 वर्षीय मुलाची कामगिरी:पुण्यातील प्रथमेशने 50 हजार फोटो जोडून तयार केला चंद्राचा सर्वात स्पष्ट फोटो

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फोटो प्रोसेस करण्यास 38-40 तास लागले

जिद्द आणि चिकाती असेल तर यश हमखास प्राप्त होते. असाच एक कारानामा पुण्यातील 16 वर्षीय विद्यार्थ्याने करुन दाखवल आहे. 16 वर्षाच्या प्रथमेश जाजूने काढलेली चंद्राची अतिशय सुंदर छायाचित्रे सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. त्याच्या फोटोमध्ये चंद्र अतिशय स्पष्ट आणि रंगीबेरंगी दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्राचा स्पष्ट फोटो बनवण्यासाठी प्रथमेशला चंद्राचे 55 हजारांहून अधिक फोटो क्लिक करावे लागले. आश्चर्य म्हणजे त्याने त्यासाठी 186 गीगाबाईट डेटा वापरला आहे. प्रथमेश म्हणाला की, त्याला भविष्यात अ‍ॅस्ट्रोफिझिक तज्ज्ञ व्हायचे आहे.

प्रथमेशने याबाबत सांगितले की, 'मी 3 मे रोजी रात्री 1 वाजता हे फोटो टिपले. मी सुमारे चार तास व्हिडिओ आणि फोटो काढले. यानंतर प्रोसेस करण्यास 38-40 तास लागले. 50000 फोटोंमागील मुख्य कारण म्हणजे चंद्राचा सर्वात स्पष्ट फोटो मला काढायचा होता. मी चंद्राचे बारीक तपशील पाहण्यासाठी सर्व फोटो एकत्र एकत्रित केले आणि फोटोंना अजून शार्प बनवले.'

त्याने पुढे सांगितले की,' माझ्याकडील रॉ डेटा जवळपास 100 एमबी होता. पण जेव्हा मी त्यावर प्रक्रिया केली, तेव्हा डेटाचा आकार 186 जीबीपर्यंत वाढला. जेव्हा मी त्यांना एकत्र केले, तेव्हा अंतिम डेटा सुमारे 600 जीबीपर्यंत पोहोचल्याचे प्रथमेश सांगितले.'

त्याने पुढे सांगितले की, 'मी काही लेख वाचले आणि यूट्यूबवर व्हिडिओ पाहिले होते. तिथूनच फोटो कॅप्चर करणे आणि त्यावर अभ्यास करणे याविषयी माहिती गोळा केली. एक खगोलशास्त्रज्ञ बनून मला खगोलशास्त्राचा अभ्यास करायचा आहे. या क्षणी, अ‍ॅस्ट्रोफोटोग्राफी हा माझ्यासाठी फक्त एक छंद आहे. हा तिसऱ्या तिमाहीतील चंद्राचा फोटो माझा सर्वात तपशीलवार आणि स्पष्ट फोटो आहे.'

इनपुट-मोहन दुबे

बातम्या आणखी आहेत...