आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:मुलाला भटक्या श्वानांसोबत कोंडणाऱ्या आईला अटक, न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली

पुणे9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलाला भटक्या श्वानांबाबत कोंडून ठेवणाऱ्या आईला कोंढवा पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. शाळेत भांडण केल्यानंतर मुलाने इतर मुलांच्या अंगावर धावून त्यांना चावा घेतल्यामुळे मुलाला त्याच्या आई-वडिलांनी दोन वर्षे घरात श्वानांसोबत कोंडून ठेवल्याचा प्रकार बुधवारी (११ मे) उघडकीस आला होता.

चाइल्डलाइन स्वयंसेवी संस्थेला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या मदतीने मुलाची सुटका केली होती. त्याला बालगृहामध्ये पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी मुलाची वैद्यकीय तपासणीही केली. त्याची तब्येत ठीक असून त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास नसल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे. आईला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली असून तिने जामिनासाठी अर्ज केला आहे. मंगळवारी सुनावणी होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...