आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात भरधाव ट्रकची दुचाकीला धडक:अपघातात आईचा जागीच मृत्यू; तर, मुलगी गंभीर जखमी

पुणे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे सोलापूर मार्गाने दुचाकीवरून घरी जात असलेल्या माय लेकीच्या दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिल्याने आईचा ट्रकखाली आल्याने जागीच मृत्यू झाला तर मुलगी गंभीर जखमी झाली. हा अपघात आज दुपारी 12 च्या सुमारास हडपसर परिसरात घडला.

वर्षाराणी राहुल बोरावके (वय 36 रा. गाडीतळ, हडपसर) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. तर मुलगी समृद्धी राहुल बोरावके (वय 15) ही जखमी झाली आहे. या प्रकरणी ट्रकचालक किरण रामकृष्ण सानप (वय 22, रा. वडझरी, ता. पाटोदा, जि. बीड) याला अटक करण्यात आली. राहुल बोरावके (वय 44) यांनी या संदर्भात हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कसा झाला अपघात ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वर्षाराणी आणि त्यांची मुलगी समृद्धी या दुचाकीवरून दुपारी पावणेबाराच्या सुमारास पुणे-सोलापूर मार्गावरील लक्ष्मी कॉलनी परिसरातून जात होत्या. यावेळी भरधाव वेगात येणाऱ्या एका ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. वर्षारानी या खाली पडल्यामुळे त्या ट्रक खाली येऊन गंभीर जखमी झाल्या. यामुळे त्यांचा मृत्यू झाला. तर समृद्धी ही मुलगी जखमी झाली. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले मात्र, वर्षाराणी यांचा उपचारपूर्वीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी ट्रकचालक किरण सानप याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक सचिन पवार तपास करत आहेत.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार

शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीमध्ये एका फार्म हाऊस वर एका बारा वर्षीय बालिकेवर बळजबरीने बलात्कार केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे विशाल दामोदर गायकवाड या नराधम युवकावर गुन्हे दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. शिक्रापूर ता. शिरुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका राजकीय नेत्याचे फार्म हाऊस असून सदर ठिकाणी काही कुटुंबीय कामाला आहे, पीडित युवतीचे आई वडील देखील सदर नेत्याच्या फार्म हाऊस वर कामाला असून मुलीचे आई वडील दोघे देखील बाहेर गेलेले असताना त्याच ठिकाणी असलेल्या विशाल गायकवाड या युवकाने पीडितेला बळजबरीने पकडून घरा मागील बाजूस घेऊन जात तिला जीवे मारण्याची धमकी देत तिचे तोंड दाबून तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला, यावेळी विशाल गायकवाड याने बारा वर्षीय मुलीला तू आत्ता घडलेला प्रकार बाबतचे कोणाला काही सांगितले तर तुझ्या आई वडिलांना खल्लास करून टाकेल अशी धमकी दिली, त्यामुळे मुलगी पूर्णतः भेदरली गेली, त्यांनतर भेदरलेल्या मुलीने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

बातम्या आणखी आहेत...