आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईसमोरच मुलाचा मृत्यू!:शाळेत चाललेल्या माय- लेकाचा भीषण अपघात; पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना

पुणे6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे मुलाला स्कूटीवरून शाळेत सोडण्यासाठी जात असतांना मोटारीने धडक दिल्याने चिमूकल्याचा त्याच्या आई समोरच मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

अथर्व रवींद्र आळणे (वय 11) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. अथर्व हा चिंचवड येथील प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता सहावी (ब) मध्ये शिकत होता. गुरुवारी त्याची आई हर्षदा ही त्याला घेऊन स्कुटीने शाळेत सोडवण्यासाठी जात होती. यावेळी जुन्या आरटीओ जवळ शाहूनगरच्या कॉर्नर जवळ एका भरधाव मोटारीने त्यांच्या स्कूटीला जोरदार धडक दिली. यात धडकेमुळे स्कुटीवरून अथर्व खाली पडला.

आई किरकोळ जखमी

यावेळी त्यांच्या जवळून जाणाऱ्या मालवाहू भरधाव ट्रक खाली अर्थव आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर हर्षदा या दुसऱ्या बाजूला पडल्याने त्या किरकोळ जखमी आहेत. मुलाचा समोरच मृत्यू झाल्याचे आईला धक्काच बसला.

ट्रकचालक, चारचाकी चालकाला अटक

या प्रकरणी ट्रकचालक आणि चारचाकी चालकाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी-चिंचवड येथे मोठ्या प्रमाणात ट्राफिक वाढले आहे. वाहतूक कोंडीतही भरधाव वेगाने आणि नियमाची पायमल्ली करून वाहने चालवली जातात. याचा फटका मात्र, सर्व सामान्य नागरिकांना बसत आहे. यामुळे अपघात होऊन निर्दोष आणि वाहतूक नियम पळणाऱ्यांच्या जीववर बेतत आहे.

दोन वेगवेगळ्या अपघातात दोघे ठार, एक जखमी

दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीररित्या जखमी झाला आहे. हे अपघात नगर-पुणे रस्त्यासह कवटीपाट टोलनाक्यावर झाले आहेत. याप्रकरणी विमानतळ आणि लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे घटना?

भरधाव पाणी टँकर चालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरूण ठार झाला. अपघातात एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात 21 नोव्हेंबरला सव्वा चारच्या सुमारास पुणे-नगर रस्त्यावर घडला. युसूफ दाउद शेख (वय 42) रा. ताडीवाला रस्ता असे ठार झालेल्याचे नाव आहे. उल्हास पाटील असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी जुबेदा शेख (वय 62) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. उल्हास पाटील असे जखमीचे नाव आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत रस्त्यानजीक पार्क केलेल्या पिकअप वाहनाला धडकून एकजण ठार झाला. हा अपघात 22 नोव्हेंबरला रात्री साडेअकराच्या सुमारास कवडीपाट टोलनाक्याजवळ कदमवाक वस्ती परिसरात घडला. हरिदास मधुकर गरड (वय 37) रा. गणेशवाडी, थेउर असे ठार झालेल्याचे नाव आहे. नितीन गरड (वय 35 ) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...