आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आंदोलनाचा इशारा:लॉकडाऊन अटी न हटवल्यास 10 ऑगस्टनंतर रस्त्यावर उतरु, अॅड. प्रकाश आंबेडकर

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • टपरीवाले, फेरीवाले यांचे व्यवसाय ठप्प झाल्याने त्यांची आज उपासमार होत आहे

कोरोनाच्या काळात लॉकडाउनमुळे राज्यातील अनेक नागरिकाचे रोजगार गेले आहेत. त्यामुळे त्यांनी जगायचं कसे हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. अनेक कामगार अजूनही बेरोजगार होण्याच्या वाटेवर आहेत. त्यामुळे राज्यातील एसटी सेवेसह स्थानिक सार्वजनिक वाहतूक आणि सर्व प्रकाराची दुकाने लवकरात लवकर सुरू करा, अन्यथा १० ऑगस्टनंतर रस्त्यावर उतरु असा, इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी दिला.

लोकांसमोर जगायचं कसं असा प्रश्न निर्माण झालेला असताना आता एसटीमधील १० हजार कामगार काढले जाणार आहेत. त्यामुळे बेरोजगारीत आणखीनच भर पडणार आहे, हे होता कामा नये. राज्यात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. दरम्यान, करोनाबाधित रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नुसत कोरोना कोरोना म्हणता बसू नका, पुराच्या संबधित काय उपाय योजना केल्या आहेत ते सांगा.टपरीवाले, फेरीवाले यांचे व्यवसाय ठप्प झाल्याने त्यांची आज उपासमार होत आहे. व्यावसायिकांची दुकाने उघडण्याची परवानगी देणार आहात की नाही ते स्पष्ट करा. तुम्हाला जो काही एसओपी तयार करायचा होता, तो तयार करा. पण हा एसओपी तयार करुन जर शासन हे स्पष्टपणे सांगणार नसेल तर १० ऑगस्टनंतर वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा अॅड. आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.