आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्‍हणाले:चित्रपटांचा समाजावर प्रचंड प्रभाव

पुणे6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

“प्रभावी पुस्तक वाचायला वेळ लागतो; पण, त्यावर आधारित दोन-अडीच तासांच्या चित्रपटात तोच आशय अधिक गतीने व अत्यंत प्रभावीपणे आपल्याला कळतो. चित्रपटासाठी निर्माता, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ, स्पॉटबॉय अशा अनेकांचे योगदान असते. सांघिक कार्यपद्धतीचा एकूण परिणाम चित्रपट असतो. चित्रपटाचा चेहरा अभिनेत्री, अभिनेते असले, तरी यश मात्र समाजावर, प्रेक्षकांवर अवलंबून असते,’ असे मत सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी व्यक्त केले.

सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने सिटीप्राइड कोथरूड येथे नुकताच चित्रपट कलाकारांचा “सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार २०२२’ने गौरव करण्यात आला. “तमाशा लाइव्ह’ चित्रपटाच्या प्रीमियरच्या निमित्ताने कलाकार, गायक, दिग्दर्शक व तंत्रज्ञ उपस्थित होते. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया, निवृत्त पोलिस महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव यांच्या हस्ते कलाकारांना सन्मानित करण्यात आले. या वेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, हेमांगी कवी, आयुषी भावे, मृणाल देशपांडे, तर अभिनेता पुष्कर जोग, नागेश भोसले, सिद्धार्थ जाधव यांच्यासह दिग्दर्शक संजय जाधव, निर्माता अक्षय बर्दापूरकर, संगीत दिग्दर्शक पंकज पढघन, गीतकार क्षितिज पटवर्धन, संगीत दिग्दर्शक अमित राज, गायक आदर्श शिंदे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...