आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचे संकट:खासदार ॲड. राजीव सातव पुन्हा व्हेंटीलेटरवर, पुण्यात तज्ञ डॉक्टरांच्या 24 तास निगराणीखाली

हिंगोली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसचे खासदार ॲड. राजीव सातव यांची प्रकृती पुन्हा एकदा गंभीर झाली असून त्यांना शनिवारी ता. १५ पहाटे पासून व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. पुण्यातच जहाँगिर हाॅस्पीटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु असून तज्ञ डॉक्टरांचे पथक २४ तास त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन असल्याचे सुत्रांनी सांगितले.

काँग्रेसचे खासदार ॲड. राजीव सातव ता. २५ एप्रील पासून पुणे येथील जहाँगिर हॉस्पीटल येथे कोविडवर उपचार घेत आहेत. ता. २९ एप्रील रोजी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. तर तातडीने गरज भासल्यास इक्मो मशीन देखील उपलब्ध करण्यात आली होती. तर मुंबईल येथील डॉ. राहुल पंडीत, डॉ. शशांक जोशी यांच्या पथकाने पुणे येथे येऊन त्यांच्या प्रकृतीची तपासणी केली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, मागील आठवड्यात त्यांच्या प्रकृतीत सुुधारणा झाली होती. त्यामुळे चोविस तासा पैकी काही तासच त्यांना व्हेंटीलेंटरवर ठेवले जात होते. त्यानंतर शुक्रवारी ता. १४ हिंगोलीच्या पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी डॉ. राहूल पंडीत यांना सोबत घेऊन पुणे गाठले. त्यानंतर डॉ. पंडीत यांनी खासदार ॲड. सातवांच्या प्रकृतीची तपासणी झाली. त्यानंतर त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. आज सकाळी डॉ. पंडीत मुंबईला रवाना झाले.

दरम्यान, खासदार ॲड. सातव यांच्या आई तथा माजीमंत्री रजनी सातव आज दुपारीच पुणे येथे पोहोचल्या आहेत. महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, प्रा. वर्षा गायकवाड, राज्यमंत्री विश्‍वजीत कदम पुणे येथे ठाण मांडून आहेत.

बातम्या आणखी आहेत...