आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • MP Amol Kolhe Takes Credit From Others And Does Nothing In The Constituency Himself Union Minister Of State Pralhad Singh Patel Criticizes Him

अमोल कोल्हे दुसऱ्यांचे श्रेय घेतात:ते स्वतः मतदारसंघात काहीच काम करत नाही, - केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांची सडकून टीका

पुणे2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

''शिरूरचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे हे स्वतः मतदारसंघात काही काम करत नाही आणि दुसऱ्यांचे श्रेय घेतात." अशी सडकून टीका केंद्रीय जलशक्ती आणि अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी गुरुवारी केली.

शिरूर लोकसभा मतदार संघातील आढावा घेतल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी भाजप पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, आमदार माधुरी मिसाळ, माजी आमदार योगेश टिळेकर, धर्मेंद्र खांडरे उपस्थित होते.

भाजप शिरूरला निवडणूक लढवणार

पटेल म्हणाले, शिरूर लोकसभा मतदारसंघात भाजप आतापर्यंत कधी लोकसभा निवडणूक लढला नाही. याठिकाणी कोण उमेदवार उभा करायचा हे पक्ष ठरवेल. या मतदारसंघात पक्षात येण्यासाठी जे इच्छुक आहे त्यांचे स्वागत आहे.

योजना सुरू केली

पटेल म्हणाले, शिरूर लोकसभा मतदारसंघात मी माझा दौरा पूर्ण केला. पुणे जिल्ह्यात ग्रामीण जल जीवन योजना आढावा घेतला आहे. चाकण परिसरात 16 गावात 158 कोटीची योजना प्रारंभ केली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत देशातील प्रत्येक घरात स्वच्छ पाणी पुरवण्याचे प्रयत्न करण्यात येते. लेह लडाख, जम्मू कश्मिर मध्ये आम्ही अतिऊंचीवर पाणी लोकांना घरपोच पोहचवले आहे. ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध नाही त्याजागी पर्याय शोधावे लागतील.

विमा देण्यासाठी विनंती करणार

पटेल म्हणाले, शेतकरी यांच्याशी पेठ आणि पाईट या गावाच्या ठिकाणी मी चर्चा केली. बटाटा आणि कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन याभागात घेतले जाते आणि त्याबाबत विविध समस्या होत्या. अन्न प्रक्रिया उद्योग मार्फत कांदा अधिक काळ टिकावा यासाठी तीन ठिकाणी प्रक्रिया उद्योग निर्माण करण्यात आले.या भागात अशाप्रकारे उद्योग निर्मितीसाठी प्रस्ताव पाठवावा. चिप्स साठी मोठ्या प्रमाणत सदर भागात बटाटा लागवड केली जाते. राज्य सरकारने सदर भागात शेतकऱ्यांना विमा फायदा द्यावा आणि तसा प्रायोगिक उपक्रम राबवावा अशी विनंती मी करणार आहे.

बैलगाडा शर्यतीबाबत पाठपूरावा

पटेल म्हणाले, पाऊस पडला की क्रॅश क्रॉप साठी शेतकरी प्रयत्न करतात परंतु त्यांनी कडधान्ये ही पिकवली पाहिजे. जी - 20 परिषद भारतात 70 ठिकाणी होणार असून त्यात नाश्त्यासाठी कडधान्य समवेश केला जाणार आहे. बैलगाडाशर्यती बाबत आमदार महेश लांडगे पाठपुरावा करत आहे. यासंदर्भात दिल्ली न्यायालयात केस सुरू असून शर्यंत सुरू करण्याच्या मागणीस यश येईल.

बातम्या आणखी आहेत...