आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात नवा राजकीय सवतासुभा; खासदार संभाजीराजे-प्रकाश आंबेडकर यांचे पुण्यात गुफ्तगू

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात राजकारणात शिळेपणा; संभाजीराजेंमुळे ताजेपणा येईल

पुणे

भाजपचे राज्यसभा खासदार संभाजीराजे भोसले आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यात शनिवारी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बैठक झाली. यात त्यांनी आपापल्या घराण्याचा थोर वारसा कथन करून राज्यात एक नवा राजकीय सवतासुभा निर्माण करण्याचे संकेत दिले. “छत्रपती शाहू महाराज व डॉ.बाबासाहेब अांबेडकर एकत्र होते तर आता प्रकाश आंबेडकरांसोबत मी का एकत्र येऊ शकत नाही?’ असा सवाल संभाजीराजेंनी केला. तर “राज्यातील राजकारणाला शिळेपणा आला आहे. त्यासाठी संभाजीराजेनी पुढाकार घेतला तर ताजेपणा येईल,’ असे सांगून अॅड. आंबेडकरांनी नव्या समीकरणांचे संकेत दिले.

प्रकाश आंबेडकर यांच्या घरी खा. संभाजीराजेंनी १०-१५ मिनिटे चर्चा केली. ते म्हणाले, ही भेट घेण्याचे कारण म्हणजे जातीय विषमता कमी करणे व बहुजन समाज एकाच छताखाली राहील यासाठी प्रयत्न करणे. शाहू महाराजांनी सुरुवातीपासून बहुजन समाजाला आरक्षण दिले, तर बाबासाहेबांचीही मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी इच्छा होती. राज्यातील अनेक पक्षांच्या नेत्यांना भेटलो. भेटीगाठीचा शेवट प्रकाश आंबेडकरांकडून केला आहे. आता मुख्यमंत्री, प्रमुख नेते व खासदारांसोबत लवकरच दिल्लीत गोलमेज परिषद घेणार असल्याचेही संभाजीराजे यांनी सांगितले.

राज्यात राजकारणात शिळेपणा; संभाजीराजेंमुळे ताजेपणा येईल
प्रकाश आंबेडकर म्हणाले, शरद पवार यांचे राजकारण मी ४० वर्षांपासून जवळून पाहत आलोय. ते ‘नरो वा आणि कुंजराे वा’ भूमिकेत असतात. शरद पवार लवकरच आरक्षणाबाबत भूमिका घेतील. राज्यात राजकारणाला शिळेपणा आला आहे. त्यासाठी संभाजीराजेंनी पुढाकार घेतला तर ताजेपणा येईल. मी राजकारणात अस्पृश्य आहे. मी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर अस्पृश्य आहे. मला विनाकारण भाजपकडे ढकलत आहेत. पण मी संभाजीराजेंबरोबर आहे. मराठा आरक्षणासाठी दोनच पर्याय उपलब्ध आहेत. पहिला म्हणजे कोर्टात पुनर्विचार याचिका तर दुसरा म्हणजे याचिका फेटाळली तर दुसरी याचिका दाखल करणे. राजसत्तेशिवाय मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही,

बातम्या आणखी आहेत...