आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:खासदार संजय राऊत यांच्यावर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची खालच्या पातळीवर टीका

पुणे22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खासदार संजय राऊत याची अवस्था कुत्र्यासारखी आहे. तो रोज सकाळी उठतो आणि भुंकतो. आमच्या मतावर तो राज्यसभेवर गेलेला महाकुत्रा आहे. तो कुत्र्याची नाही जर माणसाची अवलाद असेल तर त्याने राजीनामा द्यावा. त्यांनी राजीनामा द्यावा तो कसा आहे ते कळेल, अशी टीका कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे.

त्याने राजीनामा दिला तर मी पण राजीनामा देईल.संजय राऊत यांनी राजीनामा देऊन निवडून येऊन दाखवावं मी राजीनामा देईन.राऊत याच्यापेक्षाही वाईट शब्द आम्हाला बोलता येते.त्याचा जर बिस्मिल्ला केला असता तर त्याला कोणी विचारले असते का? अशी खरमरीत टीका कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे.

अवकाळी पावसाबाबत अब्दुल सत्तार म्हणाले,

मागील काळात 5 ते 7 वेळा गारपीट झाली असून 82 टक्के नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे झाले आहेत. राज्यात आणखी चार दिवस पाऊस पडणार असून हे अस्मानी संकट आहे. त्यामुळे कोणीही राजकारण याबाबत करू नये.बदलत्या हवामानाप्रमाणे नवीन काही पीक घेता येईल का यावर विचार सुरू आहे. नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी माझा इतका कोणताच कृषिमंत्री फिरला नाही. उद्धव ठाकरे यांचे दुखणं वेगळं आहे ते कधीच बांधावर जात नाही, त्यांना बांध माहित असला असता तर बांध फुटला नसता आणि 40 आमदार सोडून गेले नसते.

सत्तासंघर्ष निकाल बाबत धाकधूक आम्हाला नाही तर धाकधूक विरोधकांना आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे राहिलेले आमदार जसा निकाल लागेल तसे ते सगळे पक्ष सोडून चालले जातील.चर्चेप्रमाणे त्यांच्याकडचे लोक आमच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क करत आहेत.सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय असेल तो आम्ही सन्मानाने स्वीकारू.