आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामार्ग वाढवताना रस्ते सुरक्षेवरही भर द्यावा:नवले पुलावरील अपघात स्थळाच्या पाहणीवेळी खासदार सुप्रिया सुळेंचा सल्ला

पुणे16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात महामार्ग मोठया प्रमाणात होत आहे. परंतु अपघातांचे प्रमाण देखील तेवढेच वाढत आहे.त्यामुळे अपघातग्रस्त क्षेत्र कमी करण्याबाबत उपाययोजना झाल्या पाहिजे. अस वक्तव्य खासदार सुप्रिया सुळेंनी सोमवारी अपघातग्रस्त बाग असलेल्या नवले ब्रीज परिसरात भेट दिल्यानंतर पत्रकारांशी त्या बोलत होत्या.

संसदेत रोड सेफ्टी कायदा अंमलबजावणी व्यवस्थितरित्या झाली पाहिजे याबाबत आम्ही ठराव मांडू.पुण्यातील नवले ब्रीज परिसरातील वाढते अपघात कमी होण्याच्या दृष्टीने नितीन गडकरी यांना काही उपाययोजना सूचविण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी झाल्याने अपघात कमी झाले परंतु झीरो अपघाता पर्यंत ते प्रमाण आणण्याचा प्रयत्न करावा लागेल.

पुण्यात केले वक्तव्य

रस्ता सुरक्षेबाबत योग्य ती काळजी आपण घेत नाही. वाहनाच्या वेगामुळे अनेक अपघात घडतात हे आपण उदयोजक सायरस मिस्त्री यांच्या अपघातातून पाहिले आहे. वाहनात सीट बेल्ट बंधनकारक असावे. दुचाकीवर हेल्मेट घालणे आवश्यक आहे. महामार्ग बाजूला नागरी क्षेत्रात चांगले फुटपाथ व सर्व्हिस रोड निर्माण करण्याचे दृष्टीने मनपाने प्रयत्न करावे, असे देखील त्या म्हणल्या.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?

सुळे म्हणाल्या, मागील तीन ते चार वर्षापासून मी नवले ब्रीज परिसरातील विविध दुरुस्ती कामाचा आढावा घेत आहे. राष्ट्रीय महामार्ग अ‍ॅथोरीटी यांनी याठिकाणचा जो तीव्र उतार त्याबाबत अद्याप तो कमी करण्यात आलेला नाही. सदर उतार कमी कशाप्रकारे करता येईल यादृष्टीने तज्ञाचे मदतीने उपाययाेजना कराव्या लागतील. याबाबत विविध यंत्रणाशी मी बोलणी केलेली असून ते स्वत: सदर ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करुन त्याबाबतचा अहवाल देतील. त्यानंतर केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी बोलणे करण्यात येईल.

राज्यपालांनी पदाला गालबोट लावू नये

राज्यपाल भग्तसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्या संर्दभात सुळे म्हणाल्या, राज्यपाल हे महत्वपूर्ण पद असून त्या पदावर टिका करणे योग्य नाही. परंतु महाराष्ट्राचे राज्यपाल ज्या पध्दतीने वादग्रस्त वक्तव्य करतात हे दुर्देवी आहे. हे कुठे तरी थांबले पाहिजे याकरिता महाविकास आघाडी सरकार यासंर्दभात राज्यभरात आंदोलन करत आहे. राज्यपाल यांनी एकदा चूक झाली तर ठिक आहे परंतु त्यांनी वारंवार चुका करणे योग्य नाही ते जाणीवपूर्वक तशाप्रकारे वागत असल्याचे दिसून येते. राज्यात देशाला दिशा देणारे मोठे राज्यपाल होऊन गेले त्याला गालबोट लावण्याचे काम सध्याचे राज्यपाल करतात.

विरोधकांनी माझ्यावर टिका करण्यात गैर नाही

चॅनलच्या अँकरने राज्याचे परंपरेनुसार पँट-शर्ट ऐवजी साडी नेसली पाहिजे अशाप्रकारचे वक्तव्य सुळे यांनी एका भाषणात केले होते. त्यावरुन विरोधकांकडून टिका करण्यात येते त्याबाबत त्या म्हणाल्या, मी संविधानावर विश्वास ठेवणारी लोकप्रतिनीधी आहे. विरोधकांनी टिका करणे गैर नाही. कधी आम्ही त्यांच्यावर टिका करतात, कधी ते टिका आमच्यावर करतात यात विवादास्पद नाही. तंत्रज्ञानाचा वापर वाढलेला असून त्याचे ज्याप्रकारे फायदे आहे तसे तोटे आहे. माझे 35 मिनिटांचे भाषण 17 सेकंदात सांगून टिका करण्यात येत आहे. मी माझे मत मांडले आहे की, प्रत्येकाने कोणता ड्रेस घालावा हा त्यांचा अधिकार आहे.

बातम्या आणखी आहेत...