आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र लाेकसेवा आयाेगा मार्फेत घेण्यात येणाऱ्या एमपीएस्सीचे विविध पदांच्या परीक्षेतील मुख्य परीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरुपात न घेता वर्णनात्मक स्वरुपात घेण्याचा निर्णय पुढील वर्षापासून घेण्यात आलेला आहे. या परीक्षेच्या बदलास एमपीएस्सी परीक्षांची तयारी करणाऱ्या पुण्यातील विद्यार्थ्यांनी विराेध दर्शवत साेमवारी सकाळपासून पुण्यातील शास्त्रीराेडवरील आहिल्यादेवी अभ्यासिका समाेरील रस्त्यावर ठिय्या आंदाेलन केले. 700 ते 800 विद्यार्थ्यांनी रस्त्यावरच ठिय्या आंदाेलन सुरू केल्याने पोलिसांची धावपळ उडाल्याचे यावेळी पहावयास मिळाले.
विद्यार्थ्यांनी त्यांच्या भावना व्यक्त करताना सांगितले की, आतापर्यंत एमपीएस्सीकडून वस्तुनिष्ठ स्वरुपात परीक्षा घेण्यात येत हाेती. परंतु माजी आयएसएस अधिकारी चंद्रकांत दळवी यांच्या समितीने दिलेल्या शिफारशीनुसार विद्यार्थ्यांना एमपीएस्सीची मुख्यपरीक्षा आता वस्तुनिष्ठ ऐवजी वर्णनात्मक पध्दतीने द्यावी लागणार आहे. हा बदल सन 2023 पासून लागू करण्यात येणार असल्याचे एमपीएस्सीने सांगितले आहे. परंतु लगेच हे बदल करणे आम्हास अशक्य असल्याने सन 2025 पासून ही पध्दत अंमलात आणावी अशी आमची मागणी आहे.
एमपीएस्सीच्या परीक्षेत वारंवार चुकीचे प्रश्न येतात आणि त्यात नंतर बदल करण्यात येतात. त्यामुळे सातत्याने अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय हाेऊन गुणात फरक पडताे आहे. याबाबत याेग्य पेपर काढण्यात यावे अशी आमची मागणी आहे.
काेराेनामुळे दाेन वर्ष एमपीएस्सी परीक्षा हाेऊ शकल्या नाही त्यानंतर दीड वर्षातच तीन वर्षाच्या परीक्षा एकापाठाेपाठ घेण्यात आल्या असून त्याचे मुलाखत, मुख्य परीक्षा बाकी आहे. अशावेळी तात्काळ परीक्षेतील बदल अंमलात येणे आम्हास शक्य नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
राज्यभरातून ग्रामीण भागातून विद्यार्थी पुण्यात अभ्यासाला माेठया अपेक्षेने येतात त्यांच्यावर नवीन बदलामुळे अन्याय हाेईल आणि आम्हास सर्वांना गावी जाऊन पुन्हा शेतीचे कामात अडकावे लागेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली. एमपीएस्सी आंदाेलनात मुलांनी सहभागी घेऊ नये म्हणून पोलिस मुले अभ्यास करत असलेल्या लायब्ररीत रविवारी रात्री येऊन त्यांनी धमकावल्याचा आराेप ही विद्यार्थ्यांनी केला आहे.
शांततेत आंदाेलन करावे
परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त संदीप गिल म्हणाले, सदर आंदाेलनात विद्यार्थी सहभागी झालेले असून त्यांनी आंदाेलनाची काेणतीही परवानगी घेतलेली नाही. एमपीएस्सी परीक्षेतील नवीन बदल दाेन वर्षानंतर लागू करा, परीक्षा बदलास आमचा विराेध नाही असे त्यांचे म्हणणे आहे. आंदाेलना दरम्यान सुरक्षेसाठी पोलिसांनी चाेख बंदाेबस्त तैनात केला असून विद्यार्थ्यांनी शांततेने आंदाेलन करावे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.