आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानुकताच राज्यसरकारने जुना अभ्यासक्रम पुन्हा लागू करण्याचा आदेश दिल्याने प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यामध्ये असंमजस्याचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या विरोधात विद्यार्थी आक्रमक झाले असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निर्णयात राजकीय हस्तक्षेपाच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांचे वतीने अलका टॉकीज चौकात आंदोलन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या 8 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रसिध्दीपत्रकानुसार बदललेल्या अभ्यासक्रमानुसार संबंधित विद्यार्थ्यांनीअभ्यास सुरु केला आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग ही एक घटनात्मक, स्वायत संस्था असून यात अवांछनीय राजकीय हस्तक्षेप आमच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहे असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. आमच्या विद्यार्थ्यामध्ये अनेक महिला विद्यार्थिनी आहेत ज्यांना सामाजिक दबावाचा सामना करावा लागत आहे. आम्ही सुरु केलेला अभ्यास स्वयंस्फूर्त नसून आयोगाच्या सूचनेप्रमाणे आहे असं मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
स्पर्धा परीक्षाची तयारी करणारा विद्यार्थी चेतन वागज म्हणाला, जुलै महिन्यापासून आम्ही एमपीएससीच्या नवीन अभ्यासक्रमानुसार रात्रंदिवस मुख्य परीक्षेचा अभ्यास पूर्ण केलेला आहे. चार महिन्यांवर एमपीएससीची पूर्व परीक्षा आली असताना,आत्ता पूर्व परीक्षेवर आम्ही लक्ष केंद्रित करत आहे.
त्याचवेळी पुन्हा मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात बदल करणे योग्य नाही. मुख्य परीक्षा ही वर्णनात्मकच असावी असे वाटते. पूर्व परीक्षा नंतर मुख्य परीक्षे दरम्यानचा अभ्यासासाठी कमी कालावधी असतो. त्यामुळे आत्ता मुख्य परीक्षेची तयारी केलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा जुन्या अभ्यासक्रमाची तयारी करणे हे अन्यकारक आहे.स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनींना घरातून अभ्यासक्रमाची तयारी करण्यासाठी अल्पावधीचा काळ मिळतो, यादरम्यान अशाप्रकारे राजकीय हेतूने अभ्यासक्रमात बदल होत असतील तर ते चुकीचे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.