आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • MPSC's Golthan Administration Backs 60% Of Youngsters To Exams; Girls' Progress Closed Due To Misconduct In Exams; News And Live Updates

आर्थिक परिस्थिती ढासळली:एमपीएससीच्या गलथान कारभाराने 60% तरुणींची परीक्षेकडे पाठ; परीक्षांतील गैरकारभाराने मुलींची प्रगतीची दारे बंद

पुणेएका वर्षापूर्वीलेखक: मंगेश फल्ले
  • कॉपी लिंक
  • पुण्यात सोमवारी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले.

राज्यभरातील विविध शहरे अाणि ग्रामीण भागातून पदवी संपादन केलेले हजाराे तरुण अाणि तरुणी विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात केंद्रीय लाेकसेवा अायाेग (यूपीएससी), महाराष्ट्र लाेकसेवा अायाेग (एमपीएससी) व इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी येत असतात. मात्र, एमपीएससी परीक्षांचा गलथान कारभार अाणि काेलमडलेले परीक्षांचे वेळापत्रक यामुळे मुलींची प्रगतीची दारेच बंद हाेत असल्याचे दिसून येत आहे. लाॅकडाऊन, बेराेजगारीत झालेली वाढ व ढासळलेली काैटुंबिक अार्थिक परिस्थिती यामुळे ६० ते ७० टक्के मुली परीक्षांची तयारी साेडून मूळ गावी परतल्याची माहिती स्पर्धा परीक्षा शिक्षक संघटनेचे सचिव महेश शिंदे यांनी दिली अाहे.

यूपीएससी परीक्षा अाणि एमपीएससी परीक्षा यातील परीक्षा पद्धतीतील बदलांमुळे सन २०१३ पासून राज्यातील यूपीएससी परीक्षेतील एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले अाहे. यूपीएससीची मुख्य परीक्षा लेखी स्वरूपात घेण्यात येते, तर एमएससीची मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठरीत्या घेतली जाते. त्यामुळे एमपीएससीचे विद्यार्थी यूपीएससीसारख्या कठीण परीक्षेकडे वळणे कमी झाले आहेत. त्यातच पीएसअाय-एसटीअाय-असिस्टंट या पूर्वी वेगवेगळ्या हाेणाऱ्या परीक्षा एकत्रित पूर्वपरीक्षांद्वारे हाेऊ लागल्याने पूर्वपरीक्षेचे मेरिटही वाढले.

मात्र, तिन्ही परीक्षांचा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम वेगळा असल्याने मेरिटमध्ये निवडलेल्या उमेदवारांना तिन्ही परीक्षांची वेगवेगळी मुख्य परीक्षा द्यावी लागते. त्याचसाेबत राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम वेगळा असल्याने अतिरिक्त अभ्यासाची तयारी करावी लागते. तीन परीक्षांपैकी एका परीक्षेत विद्यार्थी अंतिम यादीत अाल्यावर इतर दाेन जागा रिक्त राहत असल्याने पूर्वपरीक्षेची तयारी करणाऱ्यांमध्ये वैफल्यग्रस्ताची भावना वाढलेली असून ते अांदाेलन, अात्महत्यांकडे वळताना जाणवते.

बीड, परभणी, नांदेडच्या बहुतांश मुली
पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यासाठी येणाऱ्या मुली प्रामुख्याने सातारा, सांगली, काेल्हापूर, अमरावती, बीड, परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद अादी शहरांतून येतात. यातील बहुतांश मुली शेतकरी कुटुंबातील अाहेत. काेराेनाने पुण्यात त्यांना राहणे मागील दीड वर्षापासून शक्य नाही अाणि एमपीएससी परीक्षा वेळेत हाेत नसल्याने नैराश्याच्या गर्तेत त्या सापडून लग्न व काैटुंबिक जबाबदाऱ्यांकडे त्या अधिक प्रमाणात वळत अाहेत. लग्न करणे अथवा करिअरसाठी दुसरे क्षेत्र निवडणे याकडे बहुतांश मुलींचा अाेढा वाढला अाहे.

मुलींना कमी प्रमाणात संधी : संजीवनी क्षीरसागर
बीएस्सी अॅग्रीचे शिक्षण घेतलेली साेलापूरची संजीवनी क्षीरसागर म्हणाली, मुलींना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी घरातून बाहेर पाठवण्याचे प्रमाण कमी अाहे. मागील तीन वर्षांपासून एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करत अाहे. परंतु परीक्षा वेळेत हाेत नसल्याने अडचणी जाणवतात. यूपीएससी परीक्षेचा अभ्यास करावा वाटताे. परंतु त्याचा अभ्यासक्रम वेगळा असल्याने अाम्हाला अभ्यास करताना तणाव जाणवताे. एमपीएससीत कमी जागांची भरती करण्यात येते.

एमपीएससी विरोधात पुण्यात अभाविपचे आंदोलन
पुणे | एमपीएससी परीक्षांबाबत होणाऱ्या विलंबाच्या विरोधात सोमवारी अभाविप कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. या वेळी मोठया संख्येने एमपीएससी परीक्षा देणारे विद्यार्थी या आंदोलन मध्ये सहभागी झाले होते. एमपीएससीतर्फे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. दोन वर्षांपूर्वी परीक्षा होऊन सुद्धा अंतिम निकाल न लागल्याने पुण्यातील स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्यांस आत्महत्या करावी लागली. पूर्व व मुख्य परीक्षा पास होऊन सुद्धा मुलाखतीसाठी एमपीएससीतर्फे कोणतीही तारीख जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे स्वप्नील लोणकर याने आत्महत्या केली. विद्यार्थी आपल्या कुटुंबाला आधार देण्यासाठी एमपीएससीद्वारे परीक्षा देत असतात. एमपीएससीद्वारे विद्यार्थ्यांच्या पदरात निराशाच पडत आहे. यावर सरकारने निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली.

मानसिक ताणामुळे विद्यार्थ्यांचे खच्चीकरण
सांगोल्याची बीई कॉम्प्युटर शिक्षण घेतलेली आणि स्पर्धा परीक्षा तयारी करणारी संगीता आलदर म्हणाली, दोन वर्षे एमपीएससी परीक्षा रखडल्यामुळे विद्यार्थी तणावात आहेत. मानसिक तणावाने खच्चीकरण होत आहे. त्याचे उदाहरण म्हणजे कालची घटना. भविष्यात अशा गोष्टी घडू नयेत म्हणून आयोगाने रखडलेल्या परीक्षा घेऊन नवीन वेळापत्रक जाहीर करावे.

परीक्षा पद्धतीत सुधारणेची गरज : प्रा. हरीश तिंबोळे
स्पर्धा परीक्षेचे प्राध्यापक हरीश तिंबाेळे म्हणाले, एमपीएससी परीक्षांचे बिघडलेले वेळापत्रक व लाॅकडाऊनमुळे मुलांमध्ये अालेले नैराश्य, ताण यामुळे विद्यार्थ्यांचे करिअर अंधकारमय झाले. स्पर्धा परीक्षा साेडणाऱ्या मुलींची संख्या सध्या वाढलेली अाहे. केंद्रीय स्पर्धा परीक्षांशी व अभ्यासक्रमाशी सुसंगत नियाेजनबद्ध एमपीएससी परीक्षांचे वेळापत्रक तयार केल्यास वर्षभर विद्यार्थी इतर परीक्षाही माेकळेपणाने देऊ शकतील.

बातम्या आणखी आहेत...