आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक करण्याचा प्रयत्न:मुक्ता टिळक यांच्या मुलास उमेदवारीसाठी पैशांची मागणी!

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची रस्सीखेच सुरू असताना दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल यांना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळवून देताे, यासाठी पैसे द्यावे लागतील, असा दूरध्वनी आल्याचे स्वत: कुणाल यांनी सांगितले. हे सायबर चोरट्यांचे कृत्य असण्याची शक्यता असून यातून सायबर चोरट्यांनी त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. याबाबत टिळक यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा विधानसभा मतदार संघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. महाविकास आघाडीतील इच्छुकांकडून प्रयत्न सुरू आहेत. भाजपकडून अद्याप अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही. मुक्ता टिळक यांचे पती शैलेश, चिरंजीव कुणाल यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे. कुणाल यांच्या मोबाइलवर सायबर चोरट्याने संपर्क साधून उमेदवारी मिळवून देतो, असे आमिष दाखवले. सायबर चोरट्याने पक्षातील प्रमुख नेत्यांची नावे सांगून त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. कुणाल यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असे पोलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...