आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅमेरात कैद झाला अपघात:मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर कंटेनरची कारला जोरदार धडक, पती-पत्नी आणि चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अपघातामुळे एक्सप्रेस वे जवळपास दोन तास वाहतुक विस्कळीत होती.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या भीषण रस्ते अपघातात पती-पत्नी आणि त्यांच्या 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. ते सर्व कारमध्ये होते. या घटनेचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे. यात एक कंटेनर अनियंत्रितपणे पहिले कारला आणि नंतर समोरच्या ट्रकला आदळताना दिसत आहे. या अपघातामुळे एक्सप्रेस वे जवळपास दोन तास वाहतुक विस्कळीत होती.

अपघातानंतर गाडीची अवस्था
अपघातानंतर गाडीची अवस्था

गुरुवारी खोपोली एक्झिट आणि फूड मॉलच्या मधल्या भागात हा अपघात झाला, परंतु त्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माहिती मिळताच त्याची टीम घटनास्थळी पोहोचली. कारमधील आग विझवली. सुमारे दोन तासांच्या प्रयत्नानंतर कारची बॉडी कटरने कापण्यात आली. यानंतर जॅकीन चौटियार, पत्नी लुईसा चौटियार आणि मुलगा डॅरेल चौटियार यांचे मृतदेह त्यातून काढण्यात आले. हे तिघेही पुण्याहून मुंबईत नायगावकडे जात होते.

ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाला
या अपघातात कंटेनर चालकही गंभीर जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर खंडाळ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कंटेनरच्या ब्रेक फेलमुळे हा अपघात झाल्याचे तपासात समोर आले आहे. ट्रकमध्ये बसलेल्या साइड कॅमेर्‍यात हा अपघात कैद झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...